घरताज्या घडामोडीपुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी बॉम्बचं साहित्य अॅमेझॉनवरून घेतलं विकतं

पुलवामा हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी बॉम्बचं साहित्य अॅमेझॉनवरून घेतलं विकतं

Subscribe

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी स्फोटके बनवण्यासाठी अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन कच्चा माल खरेदी केल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) चौकशीतून समोर आली आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ल्यासाठी दहशतवाद्यांनी स्फोटके बनवण्यासाठी अॅमेझॉन या ई-कॉमर्स साईटवरुन कच्चा माल खरेदी केल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास पथकाच्या (एनआयए) चौकशीतून समोर आली आहे. याप्रकरणी एनआयएने शुक्रवारी आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी केल्यानंतर ही माहिती उघड झाली आहे. एनआयएच्या माहितीनुसार, पुलवामा हल्ल्यासाठी स्फोटकं बनवण्यासाठी एनआयएच्या ताब्यात असलेल्या एका व्यक्तीने अॅमेझॉनवरुन रसायनांची ऑनलाईन खरेदी केली होती. गेल्यावर्षी झालेल्या या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. या आत्मघाती स्फोटात एक स्फोटकांनी भरलेली कार सीआरपीएफच्या ताफ्यात घुसवून दहशतवाद्यांनी स्फोट केला होता.

एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “प्राथमिक चौकशीत इस्लाम याने खुलासा केला की, जैश-ए-मोहम्मदच्या पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या निर्देशानुसार त्याने आयईडी बनवण्यासाठी रसायनं, बॅटरीज आणि इतर सामग्री खरेदीसाठी अॅमेझॉनच्या ऑनलाईन शॉपिंग अकाऊंटचा वापर केला होता. त्याने स्वतः ही सामग्री खरेदी करुन ‘जैश’च्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचवली होती.

- Advertisement -

पुलवामा हल्ल्याप्रकरणी ५ जण ताब्यात

एनआयएने शुक्रवारी श्रीनगर येथून बाग-ए-मेहताब भागातील वजीर-उल-इस्लाम (वय १९) आणि पुलवामातील हकरीपुरा गावाचा मोहम्मद अब्बास राठेर (वय ३२) यांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे याप्रकरणी आता ताब्यात घेण्यात आलेल्यांची संख्या ५ झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -