घरमुंबईपर्यावरण संवर्धनासाठी पाठ्यपुस्तकांचे होणार पुनर्वापर

पर्यावरण संवर्धनासाठी पाठ्यपुस्तकांचे होणार पुनर्वापर

Subscribe

२०१९-२०, २०२०-२१ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके जमा करून त्याचे फेरवाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले आहे. या उपक्रमातून कागदाची बचत होउन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

शालेय विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे यासाठी अभ्यासक्रमात ‘पर्यावरण’ विषयाचा समावेश केला. पर्यावरण जतनासाठी विद्यार्थ्यांना ‘थ्री-आर’ संकल्पना शिकवली जाते. या संकल्पनेचा एक भाग म्हणून पाठ्यपुस्तकांचे प्रायोगिक तत्त्वावर पुनर्वापर करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यासाठी २०१९-२०, २०२०-२१ शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके जमा करून त्याचे फेरवाटप करण्याचा पथदर्शी प्रकल्प राबवण्याचे शालेय शिक्षण विभागाने ठरवले आहे. या उपक्रमातून कागदाची बचत होउन झाडांचे संवर्धन होण्यास मदत होणार आहे.

समग्र शिक्षा योजनेंर्तगत इयत्ता पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना दरवर्षी सरकारकडून मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात येते. यासाठी दरवर्षी सुमारे २०० कोटीपेक्षा जास्त खर्च येतो. शालेय विद्यार्थ्यांना वाटप केलेल्या पुस्तकांपैकी काही विद्यार्थी पाठ्यपुस्तकांची योग्यरितीने जपणूक करतात, त्यांना सुस्थितीत ठेवतात, अशी पुस्तके जमा करून त्यांचा पुनर्वापर केल्यामुळे पुढील वर्षी त्याचे फेरवाटप करणे शक्य होईल. त्यामुळे ज्या शाळांमध्ये समग्र शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तक योजना राबवली जाते अशा शाळेतील मुलांना व पालकांना त्यांनी वापरलेली पाठ्यपुस्तके शाळेत जमा करण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे. ही योजना ऐच्छिक असून, यामुळे विद्यार्थ्यांना पुस्तके सुस्थितीत ठेवण्याची सवय लागेल. कोरोनाच्या पाश्वर्भमूीवर हा उपक्रम शाळा सुरू झाल्यावर राबवण्याच्या सूचना शिक्षण विभागाने शाळांना दिल्या आहेत. हा उपक्रम पहिल्या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. यातून कागदाची बचत झाल्यामुळे झाडाचे संवर्धन होण्यास मदत होईल.

- Advertisement -

शालेेय विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिक्षणातंर्गत पर्यावरणाच्या संरक्षणासाठी विविध उपक्रम राबवण्यात येतात. यामध्ये ‘वापर कमी करणे, पुन्हा वापर करणे, पुनर्वापर करणे’ ही संकल्पना मुलांना शिकवली जाते. ही संकल्पनेची प्रत्यक्षात शिक्षण विभागाकडूनही अमलबजावणी केली जावी यासाठी पाठ्यपुस्तकांचा पुनर्वापर करण्याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक जारी केले आहे. या उपक्रमातून किती पाठ्यपुस्तके जमा होतील, विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद कसा असेल, यावरून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -