घरमुंबईVideo : सिगारेटच्या धुरावरून ठाण्यात राडा, गुंडांनी थेट काढले रिव्हॉल्व्हर!

Video : सिगारेटच्या धुरावरून ठाण्यात राडा, गुंडांनी थेट काढले रिव्हॉल्व्हर!

Subscribe

हल्ली कशामुळे भांडण विकोपाला जाईल आणि राडा होईल, याचा काहीही नेम नाही. शिवाय, गल्ल्यागल्ल्यांमधून फिरणाऱ्या टोळक्यांची भाईगिरी करण्याची खुमखुमी या गावगुंडांना स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे अगदी क्षुल्लक गोष्टींवरून देखील विकोपाला गेलेली भांडणं समोर आली आहेत. ठाण्यात देखील असाच एक प्रकार घडला असून फक्त सिगारेटचा धूर तोंडावर सोडल्यामुळे दोन गावगुंडांच्या गटांमध्ये हाणामारी झाली. एकमेकांवर दगडफेक झाली. आणि या घोळक्याच्या कथित म्होरक्यांनी थेट एकमेकांवर रिव्हॉल्व्हर रोखली. स्थानिक पोलिसांनी जर वेळीच मध्यस्थी करून या भामट्यांना आवर घातला नसता, तर प्रकरणाला मोठं गंभीर वळण लागायला वेळ लागला नसता. सगळ्याच महत्वाची बाब म्हणजे लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर येऊन सिगारेट पिण्याचा शहाजोगपणा या गावगुंडांना कसा करता आला, हा देखील एक प्रश्नच आहे!

झालं काय?

ही घटना आहे सोमवार रात्रीची. ठाण्यातल्या श्रीनगर परिसरातील्या साठे नगर भागात अमर तुषांभर आणि सूरज यादव या दोघा गावगुंडांच्या टोळ्या गुंडगिरी करत हिंडत असतात. या दोन्ही टोळ्यांवर पोलीस स्थानकात अनेक गुन्हे देखील दाखल आहेत. १७ मे रोजी रात्री अमर तुषांभर या टोळीचा गुंड वैभव उर्फ कान्या साळवे याने सूरज यादवच्या तोंडावर सिगारेटचा धूर सोडला. या प्रकारामुळे इगो दुखावलेल्या सूरजने वैभवला चोप दिला. याचा राग मनात धरून सोमवारी रात्री वैभव आपल्या टोळीतील अमर तुषांभर याच्यासह सात ते आठ जणांना घेऊन साठेनगरमध्ये आला. तिथे उभ्या असलेल्या सूरज यादव आणि त्याच्या सहकाऱ्यांवर अमर तुषांभर टोळीने हल्ला केला.

- Advertisement -

यावेळी या दोन्ही टोळ्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन दोन्ही टोळ्यांनी एकमेकांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान तुषांभर याने कमरेला खोचलेली रिव्हॉल्वर काढून सूरजला ‘ठोक दूँगा’ अशी धमकी दिली. या घटनेची माहिती मिळताच श्रीनगर पोलिसानी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही टोळ्यांमधल्या गुंडांची धरपकड करून ४ जणांना ताब्यात घेतले. या दगडफेकीत दोन्ही टोळीतील ४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार करून दोन्ही टोळ्यांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यात ४ जणांना अटक करण्यात आलेली असून अमर तुषांभर आणि इतरांचा कसून शोध घेण्यात येत असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून या ठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

ठाण्यात गावगुंडांची गुंडगिरी, निवासी भागात रिव्हॉल्व्हर रोखून राडा!

ठाण्यात गावगुंडांची गुंडगिरी, निवासी भागात रिव्हॉल्व्हर रोखून राडा!

आपलं महानगर – My Mahanagar ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಮೇ 19, 2020

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -