घरताज्या घडामोडीवजन कमी करण्याच्या गोळ्या जीवावर बेतल्या

वजन कमी करण्याच्या गोळ्या जीवावर बेतल्या

Subscribe

वजन कमी करण्यासाठीच्या गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आत तिचा मृत्यू झाला.

वजन कमी करण्यासाठी आपण अनेक उपाय करत असतो. मात्र हेच उपाय आपल्या जीवावर बेततात. अशाप्रकरणाची घटना ठाण्यात घडली आहे. तिने वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेतल्यामुळे काही तासातच तिचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मेघना देवगडकर असं या मृत मुलीचं नावं असून ती अवघ्या २२ वर्षांची होती. ती पेशाने नृत्यांगना होती तसंच ती जीम ट्रेनर म्हणूनही काम करत होती. मुंबई मिररच्या वृत्तानुसार, वजन कमी करण्यासाठी ज्या गोळ्या बंदी घातली होती. त्याच गोळ्याचे सेवन मेघनाने केलं होत.

नक्की काय घडलं?

काही दिवसांपूर्वी ती जीम ट्रेनर म्हणून रुजू झाली होती. तिने वजन कमी करण्याच्या गोळ्या जीममध्ये वर्कआऊटला निघण्याआधी घेतल्या होत्या. तिला गोळ्या घेतल्यानंतर उलट्या होऊ लागल्या. त्यामुळे तिला आधी घरातजवळच्या डॉक्टराकडे नेले. त्यानंतर तिला लाइफलाइन हॉस्पीटलमध्ये नेण्यात आले आणि पुन्हा तिला तिथून सायन हॉस्पीटलमध्ये दाखल केले. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. पण तिचा कार्डीअक अरेस्टने मृत्यू झाला. तिने गोळ्या घेतल्यानंतर पंधरा तासांच्या आत तिचा मृत्यू झाला.

- Advertisement -

डॉक्टरांच्या माहितीनुसार, मेघनाने बंदी घातलेल्या गोळ्या घेतल्यानंतर तिला हायपरथरमियाचा त्रास सुरू झाला. मेघनाच्या शरीरातील तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढल्यामुळे तिला कार्डीअक अरेस्टरने मृत्यू झाला. याप्रकरणी अपघात मृत्यू अशी नौपाड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून एफडीएला अहवाल पाठविण्यात आला आहे. तसंच बंदी घातलेल्या गोळ्या तिला कशा मिळाल्या या अनुषंगाने पोलिसांचा तपास सुरू आहे.


हेही वाचा – तरुणाने वाचवले ५ जणांचे प्राण; जेजेत यशस्वी अवयवदान

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -