घरमुंबईठाणे पोलीस आयुक्तांनी शायरी अंदाजने दिल्या ईदच्या शुभेच्छा

ठाणे पोलीस आयुक्तांनी शायरी अंदाजने दिल्या ईदच्या शुभेच्छा

Subscribe

स्व. परशराम टावरे स्टेडियम येथील सभागृहात हिंदू - मुस्लिम बांधवासाठी जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता अंतर्गत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.

“दरारे आपनो इस तरहा ना बडानां, की गैरो को आकार मरम्मत करनी पढे” … “हम तो चाहत और दोस्ती दोनो इबाद्त कि तरह रखते है ” ही शायरी बोलत ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुस्लिम बांधवानां पवित्र रमजान महिन्यातील ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुस्लीम बांधवांनीही पोलीस आयुक्तांच्या शायरीला व्वा व्वा करीत दाद दिली.

भिवंडी शहरात लाखोंच्या संख्येने मुस्लिम बांधव राहत असून शहरात जातीय सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावा. यासाठी मुस्लिम बांधवानांच्या पवित्र रमजान महिनानिमित्ताने ठाणे पोलीस आयुक्तालय आणि भिवंडी पोलीस उपायुक्त परिमंडळ- 2 च्या वतीने शहरातील स्व. परशराम टावरे स्टेडियम येथील सभागृहात हिंदू – मुस्लिम बांधवासाठी जातीय सलोखा राष्ट्रीय एकात्मता अंतर्गत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

या प्रसंगी भिवंडी निजामपूर महापालिका आयुक्त मनोहर हिरे, अतिरिक्त पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त अंकित गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोककुमार रणखांब मौलाना हिदायत उल्ला अदि मान्यवरासह सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अधिकारी कर्मचारी व शांतता समीती सदस्य, पत्रकार व मान्यवर हिंदू -मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -