घरमुंबईसाध्या लोकलला धक्का न लावत एसी लोकल चालवा

साध्या लोकलला धक्का न लावत एसी लोकल चालवा

Subscribe

मध्य रेल्वेला प्रवाशी संघटनांच्या जाचक सूचना

मध्य रेल्वे मार्गावर सहा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. या संदर्भात मध्य रेल्वेने सर्व रेल्वे प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींना विचारविनिमय करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत प्रवाशी संघटनांकडून मध्य रेल्वेला सूचना देण्यात आली आहे. सोबतच मध्य रेल्वेच्या या निर्णयावर रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे, सोबतच सामान्य प्रवाशांच्या सुखसुविधाला धक्का न लावता मध्य रेल्वेने एसी लोकल चालवाव्यात अशा सूचना रेल्वे प्रवासी संघटनांकडून देण्यात आले आहे.

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मध्य रेल्वे मार्गावर सहा एसी लोकल सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे या पश्चिम रेल्वेवर धावलेल्या लोकल नसून नव्या लोकल्स मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहे. याआधी पश्चिम रेल्वे मार्गावर धावलेल्या लोकल्स मध्य रेल्वे मार्गावर वळवल्या जात असत. मात्र एसी लोकलच्या बाबतीत असे होणार नाही. प्रवाशांनी याबाबत व्यक्त केलेल्या नाराजीचा विचार करून सहा नव्या कोर्‍या लोकल मध्य रेल्वेवर धावणार आहेत. त्यासाठी मध्य रेल्वे मार्गावरील विविध प्रवाशी संघटनांच्या अध्यक्षांची शुक्रवारी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे समस्त रेल्वे प्रवासी संघटनांनी स्वागत केले आहे. परंतु त्याचबरोबर काही उपायसुध्दा सुचविले आहेत. वातानुकूलित लोकल सुरू करण्यास रेल्वे प्रवाशी व प्रवाशी संघटनांचे अवश्य सहकार्य राहील. परंतु, वातानुकूलित लोकल सुरू करण्याकरिता अगोदर सुरू असलेली कुठलीही लोकल रद्द वा तिच्या वेळेतही बदल करु नये, अशी सूचना मध्य रेल्वेला देण्यात आली आहे.

- Advertisement -

साध्या लोकलला तीन वातानुकूलित डबे जोडावेत
वातानुकूलित लोकल सुरू करण्याअगोदर सामान्य रेल्वे प्रवाशांच्या रेल्वे प्रवासाचा प्रथम विचार करण्यात यावा. तसेच वातानुकूलित लोकलकरिता अगोदरची कुठलीही लोकल रद्द न करता त्याच लोकलला अतिरिक्त तीन वातानुकूलित डबे वाढवून चालवावी. सर्व बारा डबा लोकल गाड्यांना तीन वातानुकूलित डबे जोडल्यास आवश्यक व गरजेच्या वेळी सर्वच रेल्वे प्रवाशांना वातानुकूलित डब्यांमधून रेल्वे प्रवास करण्यास मिळेल. तसेच ठराविक वेळेत असलेली वातानुकूलित लोकल पकडण्यासाठीची धावपळही होणार नाही. अशा सूचना मध्य रेल्वेच्या प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींनी मध्य रेल्वे प्रशासनास केली आहे.

अपघातांना आळा बसण्यासाठी सूचना
ठाण्याच्या पुढे वाढत जाणारी प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन ठाण्यावरुन कर्जत, कसारा, खोपोली, बदलापूर, टिटवाळा अशा लोकल सोडण्यात याव्यात अशी आग्रही मागणी करण्यात आली. जेणेकरुन अपघातांना आळा बसेल. मध्य रेल्वे प्रशासन येणार्‍या वातानुकूलित लोकल या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते कल्याण, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल(हार्बर) व ठाणे ते पनवेल(ट्रान्स हार्बर) अशा चालवणार आहेत. सर्व प्रवासी संघटनांकडून वातानुकूलित लोकल टिटवाळा, बदलापूर,कर्जत अशी चालविण्यात यावी, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती रेल परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी दैनिक ‘आपलं महानगर’ला दिली आहे.

- Advertisement -

मध्य रेल्वे प्रशासनाने मध्य रेल्वेवर एसी लोकल चालविण्याच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मात्र सामान्य प्रवाशांच्या साध्या लोकलला धक्का न लावता, मध्य रेल्वेने या एसी लोकल चालवाव्यात. मात्र त्याच बरोबर सामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी म्हणणार्‍या साध्या लोकलकडे सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे.
सुभाष गुप्ता – अध्यक्ष, रेल्वे परिषद

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -