घरमुंबईचालकाला हार्ट अ‍ॅटॅक आल्याने BEST बसला अपघात; प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

चालकाला हार्ट अ‍ॅटॅक आल्याने BEST बसला अपघात; प्रसंगावधानामुळे वाचला प्रवाशांचा जीव

Subscribe

मुंबईत बेस्टचा अपघात, बस चालकावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर

मुंबईमध्ये चेंबूर परिसरात धावत्या बेस्ट बसला अपघात झाला आहे. बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.चालकाला हृदयविकाराचा झटका आल्याने बसवरचं नियंत्रण सुटून अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. घाटकोपरहून टाटा पॉवर हाऊस, चेंबूरच्या दिशेने जाणाऱ्या बेस्टच्या ३८१ क्रमांच्या बसला हा अपघात झाला. चेंबूर पोलीस स्टेशनच्या समोर बसंत पार्क या ठिकाणी सकाळी पावणे ११ ते सव्वा अकराच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळतेय.

तर बस चालकाने प्रसंगावधान दाखत वेग कमी करुन बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बस फूटपाथवर असलेल्या एका भाजीच्या दुकानात घुसली आणि सिग्नलला धडकून थांबली. त्यामुळे या घटनेतले सगळे प्रवासी सुखरुप आहेत. तर बस चालकावरही उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे.

- Advertisement -

बससे चालक हरिदास पाटील (चालक क्रमांक ९१२८५) यांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारास दाखल करण्यात आले. सुदैवाने बस मध्ये असलेल्या दहा ते बारा प्रवासी सुखरूप आहेत. बेस्ट चालकाने प्रसंगावधान दाखवून बेस्ट बस बाजूला घेतल्याने आणि वेग कमी केल्याने मोठी दुर्घटना टळली. या बेस्ट चालकाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बेस्टच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बाजूला हटवली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -