घरCORONA UPDATECoronavirus: लॉकडाऊनमुळे कल्याणातील कुंभार समाज चिंतेत!

Coronavirus: लॉकडाऊनमुळे कल्याणातील कुंभार समाज चिंतेत!

Subscribe

कल्याणातील कुंभार समाजालाही मोठा फटका बसला आहे, एकीकडे घराचा गाडा कसा हाकायचा याचं टेन्शन असताना दुसरीकडे गणेशोत्सवासाठी मुर्ती कशा आणि कधी बनवणार? याची चिंता त्यांना भेडसावत आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्रच लॉकडाऊन असल्याने त्याचा परिणाम सर्वच उद्योग व्यवसायावर पडला आहे. कल्याणातील कुंभार समाजालाही मोठा फटका बसला आहे, एकीकडे घराचा गाडा कसा हाकायचा याचं टेन्शन असताना दुसरीकडे गणेशोत्सवासाठी मुर्ती कशा आणि कधी बनवणार? याची चिंता त्यांना भेडसावत आहे. गेल्या महिनाभरापासून सुरू असणाऱ्या लॉकडाऊनने कल्याणच्या कुंभार समाजात चिंतेचे वातावरण आहे. साधारणपणे एप्रिल महिन्यापासून गणपतीची मूर्तीं साकारण्याच्या कामाला कुंभार बांधव सुरुवात करतात. मात्र, लॉकडाऊनमुळे गणपतीची मूर्ती बनवण्यासाठी साहित्य उपलब्ध होत नाहीये, मुर्ती बनवण्यासाठी लागणारी माती ही गुजरातमधून येते. लॉकडाऊनमुळे सध्या ती ही येतं नसल्याने काम कसं करणार? असा प्रश्न त्यांना सतावत आहे. लॉकडाऊन असाच वाढत गेला तर गणपती उत्सव होणार की नाही? याची मोठी चिंता त्यांना लागली आहे.

भाजी, बिस्कीट विकून पोट भरतात

कुंभार बांधव गणपती आणि नवरात्रीमध्ये काम करून वर्षभराची पुंजी जमा करतात. लॉकडाऊनमुळे सर्वच कामे ठप्प झाली आहेत. एकंदर परिस्थिती पाहता उदरनिर्वाह कसा करायचा? या चिंतेत कुंभार समाज अडकला आहे. सध्या काहीही काम नसल्याने काहीजण भाजी-बिस्किटं विकून पोट भरत आहेत. त्यामुळे सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी मूर्तीकार सदाशिव कुंभार यांनी केली आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन पुढे वाढतच चालला आहे. परिणामी, घर कसं चालवायचं या प्रश्नाबरोबरच आगामी गणेशोत्सवासाठी मूर्ती कशा आणि कधी बनणार? याची चिंता त्यांना भेडसावत असल्याचे मुर्तीकार अनिल कदम यांनी सांगितलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -