घरमुंबईमुंबईत 'या' ठिकाणी साजरी होतेय भोंगामुक्त महाशिवरात्री!

मुंबईत ‘या’ ठिकाणी साजरी होतेय भोंगामुक्त महाशिवरात्री!

Subscribe

मागील वर्षी उल्हासनगर शहरात हिराली फाउंडेशनच्या वतीने पिपाणी आणि भोंगा मुक्त महाशिवरात्री हि मोहीम राबविली होती.

मागील वर्षी उल्हासनगर शहरात हिराली फाउंडेशनच्या वतीने पिपाणी आणि भोंगा मुक्त महाशिवरात्री हि मोहीम राबविली होती. यंदा ही पालिका आणि पोलीस विभागाने कंबर कसली असून पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी पिपाणी वाजविणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे. उल्हासनगर शहरात महाशिवरात्री निमित्त दोन ठिकाणी जत्रा भरतात. या जत्रांमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात कर्णकर्कश आवाजात पिपाण्या आणि भोंगे वाजवले जातात. या आवाजामुळे जत्रेमध्ये हाणामाऱ्या होण्याच्या घटना वारंवार घडतात. यावर उपाय म्हणून हिराली फाउंडेशनच्या तक्रारीवरून भोंगा आणि पिपाण्या मुक्त जत्रा करण्याचे प्रशासनाने देखील ठरविले होते. मागील वर्षी हा उपक्रम सुरू झाला आणि पहिल्याच वर्षी पालिका आणि पोलीस विभागाने मिळून हजारो भोंगे जप्त केले होते.

- Advertisement -

मागील वर्षी मध्यवर्ती, विठ्ठलवाडी आणि हिललाईन पोलिसांनी तरुणाईच्या हातातील तसेच विक्रीसाठी ठेवलेले हजारो भोंगे आणि पिपाण्या जप्त केल्या होत्या. या जप्त केलेल्या पिपाण्यांवर मुलांना नाचायला सांगून त्या पापण्या तोडून टाकल्या होत्या. यामुळे जत्रेत होणारे वाद, भांडणे आणि पोरींना छेडण्याचे प्रकार कमी झाले होते. यंदा देखील भोंगेमुक्त महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे. याबाबत पोलीस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांनी सांगितले कि जत्रेत नाना स्वभावाची लोक येतात. कर्णकर्कश पिपाण्या कानात वाजविल्यामुळे राग येऊन भांडणे होत होती. त्यामुळे मागील वर्षी पिपाण्या आणि भोंगे जप्त केल्या होत्या. त्यामुळे कायदा सुव्यवस्था उत्तम राहिली. यंदा ही पोलिसांबरोबर पालिकेची पथके तैनात करण्यात आली असून पिपाण्यांची विक्री होणार नाही, याबाबत पालिकेने उपाययोजना केल्या आहेत.

याबाबत हिराली फौंडेशनच्या सरिता खानचंदानी यांनी सांगितले की पिपाण्यांच्या आवाजाची ध्वनी क्षमता मोजली असता ती ११० ते १३० डेसीबल असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्लॅस्टिकच्या पिपाण्या बंद करण्याची मागणी पोलीस आणि पालिका प्रशासनाकडे केली होती. त्याला दोन्ही विभागांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. यंदा आम्ही भोंगे आणि पिपाण्यांमुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि त्याचे मानवावर होणारे परिणाम याचा व्हिडिओ प्रकाशित केला आहे. त्यामुळे याचा नक्कीच फायदा होईल.

- Advertisement -

हे ही वाचा – महाशिवरात्रीला ५९ वर्षानंतर आला ‘शश’ योग


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -