Thursday, July 29, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर मुंबई अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पहिल्यांदाच न्यायालयासमोर; म्हणाले 'तो कंटेंट...

अटकेनंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा पहिल्यांदाच न्यायालयासमोर; म्हणाले ‘तो कंटेंट पॉर्न नाही’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली असून पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा आरोप राज कुंद्रावर आहे. मात्र आता राज कुंद्रा यांच्या वकिलाने कुंद्रा यांना ज्या अश्लील चित्रपटांच्या प्रकरणामध्ये अटक करण्यात आली ते चित्रपट पॉर्नोग्राफी प्रकारामध्ये मोडत असल्याचा युक्तीवाद केला आहे. हा युक्तीवाद राज कुंद्रा यांचे वकील आबाद पोंडा यांनी न्यायालयासमोर केले. यावेळी सोमवारी मुंबई पोलिसांनी केलेल्या अटकेच्या कारवाईवर देखील त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

‘कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही’

गेल्या काही महिन्यांपूर्वी मुंबई पोलिसांनी अश्लील चित्रपट अर्थात पॉर्नची निर्मिती करून अ‍ॅप्सवर प्रदर्शित करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केल्याचे समोर आले होते. या प्रकरणामध्ये कुंद्रा मुख्य आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी या कारवाईचं समर्थन करताना केला होता. त्यावर राज कुंद्रा यांनी पोंडा यांच्या माध्यमातून आपली भूमिका मांडली. आपण निर्माण केलेल्या कंटेटला कायदेशीर भाषेत पॉर्न म्हणता येणार नाही. हा कंटेट अश्लील प्रकारामध्ये मोडतो असा युक्तीवाद कुंद्रांच्या वकिलांनी केल्याचे समोर आले आहे.

कुंद्रा यांचे वकिलांनी केला असा दावा

- Advertisement -

राज कुंद्रा यांच्यावर झालेल्या कारवाईमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत कलम ६७ अ चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय दंडसंहितेनुसार अश्लील साहित्य पाठवण्यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये हा कलम लावला जातो. प्रत्यक्ष शरीरसंबंध ठेवतानाचे साहित्य असल्यास त्याला कायदेशीर भाषेमध्ये पॉर्न असे म्हटले जाते, अशा प्रकारचा युक्तीवाद देखील त्यांनी केला.

असं म्हणाले कुंद्रा यांचे वकील

“माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत असणारे कलम हे आयपीसीच्या कलमांप्रमाणे नसतात. मात्र इथे पोलिसांनी तेच केले आहे. माहिती तंत्रज्ञान कायद्यामधील कलम ६७ अ हे लैंगिक कृत्यांसंदर्भातील आहे. प्रत्यक्ष संभोगालाच कायद्यानुसार पॉर्न म्हटले जातं. इतर सर्व प्रकारच्या कंटेंट अश्लील प्रकरणात मोडतो,” असे पोंडा म्हणाले आहेत.

- Advertisement -