शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला अटक; पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरणाचा आरोप

मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

Shilpa Shetty to divorce Raj Kundra?
शिल्पा शेट्टी देणार राज कुंद्राला घटस्फोट?

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती, उद्योगपती राज कुंद्राला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. पॉर्नोग्राफिक चित्रपट चित्रीकरण आणि ते विविध अ‍ॅप्सच्या माध्यमातून प्रदर्शित करण्याचा राज कुंद्रावर आरोप आहे.  मुंबई गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलने फेब्रुवारी २०२१ मध्ये राज कुंद्राच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुन्हे शाखेचा तपास सुरु झाला होता. या प्रकरणात अनेकांची चौकशी करण्यात आली. या चौकशीदरम्यान कुंद्राचा अश्लील चित्रपट निर्मितीत सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते.

कुंद्राला या प्रकरणात अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. आजही (सोमवारी) कुंद्राला चौकशीसाठी बोलवण्यात आले आणि त्याची साधारण ७-८ तास चौकशी झाली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून उद्या (मंगळवारी) त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. आमच्याकडे कुंद्रा विरोधात पुरावे असल्याचे मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून सांगण्यात आले.