घरमहाराष्ट्रमदत करा, आम्ही पुरात अडकलो आहोत, चिपळूणवासीयांचा टाहो!

मदत करा, आम्ही पुरात अडकलो आहोत, चिपळूणवासीयांचा टाहो!

Subscribe

चिपळूणमध्ये मुसळधार पाऊस पडत असून २००५ सारखी पूरस्थिती निर्माण झाली आहे. तब्बल पाच हजाराहून अधिक नागिरक पुरात अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नागरिक मदतीसाठी याचना करत असून यातून त्यांची सुटका करण्याचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा आहे.

चिपळूणवासीय झोपेत असताना पहाटे ४ वाजल्यापासून शहर परिसरात पाणी भरण्यास सुरुवात झाली. अचानक पाण्यात वाढ झाली आणि संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला. अनेक ठिकाणी लोक अडकले असून ही सांख्य पाच हजार एवढी असावी. दरम्यान, बचावासाठी बोटी सोडण्यात आल्या आहेत. तर एनडीआरएफचे पथक येत्या काही तासात चिपळूणला दाखल होत आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या घरात सुद्धा पुराचे पाणी शिरले असून येथील शासकीय यंत्रणा सुद्धा हतबल झालेली दिसून येत आहे. नागरिक भयग्रस्त झाली असून सुटकेसाठी याचना करताना दिसत आहे.

- Advertisement -

२००५ च्या पुनरावृत्तीची भीती

पहाटे चार वाजल्यापासून शहरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरू लागले आणि अवघ्या दोन तासात कंबरभर पाणी झालं. शहरालगतच्या गावांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं असून अनेक घरं पाण्याखाली आहेत. या घरातील काही लोक पुरात अडकले असून ते मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. बाजारपेठेत कंबरभर पाणी असून चिपळूणध्ये २००५ ची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती व्यक्त केली जात आहे.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -