घरमुंबईपार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आता गटारांवरच वाहनतळ

पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी आता गटारांवरच वाहनतळ

Subscribe

बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधण्याच्या अगोदर पार्किंगची सुविधा दिली नसल्याने संपूर्ण शहरात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. यावर उपाय म्हणून आता शहरातील अनेक नाल्यांच्या मूळच्या ढाच्यात बदल करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : वाढत्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचाच नव्हे पात्र पार्किंगचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. यावर उपाय सापडत नसल्याने महापालिका एकाच बाणाने दोन शिकार करण्यासाठी सरसावली आहे. कोपरखैरणे येथे नाल्याची रुंदी वाढवून, तसेच हा नाला वरून सिमेंट क्राँकीटने बंदिस्त करून त्यावर वाहने पार्किंग करण्याची कल्पक योजना अधिकार्‍यांनी शोधून काढली आहे. यासंदर्भातील ठराव नुकताच मंजूर करण्यात आला आहे.

बांधकाम व्यावसायिकांनी इमारती बांधण्याच्या अगोदर पार्किंगची सुविधा दिली नसल्याने संपूर्ण शहरात रस्त्याच्या कडेला वाहने उभी केली जातात. यावर उपाय म्हणून आता शहरातील अनेक नाल्यांच्या मूळच्या ढाच्यात बदल करण्यात येणार आहे. त्यावर पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे.

- Advertisement -

वाशीनंतर आता कोपरखैरण्यात हा प्रयोग राबवला जाणार आहे.कोपरखैरणे परिसरातील गावठाण परिसरात एकूण पाच इमारतींच्या परिसरात असलेल्या नाल्यांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. नाल्यांची रुंदीने वाढवून, त्यावरील जुने आरसीसी काम तोडून ते नव्याने करण्यात येणार आहे. त्यासाठी नुकतीच स्थायीसमितीमध्ये मंजुरी घेण्यात आली आहे.

जवळपास ८१६ मीटर नाल्यांची दुरुस्ती करण्याचा हा प्रस्ताव आहे. या परिसरात पावसाळ्यात पाण्याचा निचरा योग्यप्रकारे होत नसल्याने परिसरात पुरमय स्थिती असते. एक कोटी पंधरा लाख रुपये खर्चून आता हे काम उरकले जाणार आहे. या कामाला मंजुरी घेण्यात आली आहे. विशेष म्हणजे आता या नाल्याला मजबूत स्लॅब मिळणार असून त्यावर गाड्या पार्किंगची सुविधा उपलब्ध होणार आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -