घरमुंबईउल्हासनगर पालिकेतून पाणीपुरवठा अभियंता कार्यमुक्त

उल्हासनगर पालिकेतून पाणीपुरवठा अभियंता कार्यमुक्त

Subscribe

प्रतिनियुक्तीवर आलेले आणि गेली अनेक वर्ष उल्हासनगर पाणीपुरवठा अभियंता पदावर कार्यरत असणारे कलई सेलवन यांना पालिका आयुक्त अच्युत हांगे यांनी कार्यमुक्त केले आहे. त्यामुळे सेलवन हे त्यांचे मूळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या खात्यात रवाना झाले आहेत. खात्याने त्यांची बीड येथे बदली केली आहे. हांगे यांनी सेलवन यांच्या जागी उपअभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांच्याकडे पदभार सोपवला आहे.

सेवानिवृत्तीला दोन वर्षांचा कालावधी शिल्लक असताना प्रतिनियुक्तीवरील अधिकार्‍याला मूळ संवर्गात परत येणे आवश्यक आहे. सेलवन यांना सेवानिवृत्तीला दोन वर्ष शिल्लक असताना प्राधिकरणाने त्यांना परत येण्याचे तसेच बदली झालेल्या ठिकाणी हजर राहण्याचे पत्र पाठवले होते. त्यात पालिकेने कार्यमुक्त केले नाही तर एकतर्फी कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर व्हावे, असे आदेश दिले होते. पण, पाणीपुरवठा विभागाच्या अनेक योजनांचे काम सुरू असल्याने सेलवन यांना कार्यमुक्त करता येत नाही. त्यांना मुदत द्यावी, अशी विनंती पालिकेच्यावतीने करण्यात आली होती.

- Advertisement -

मात्र, मुदत संपल्यावर प्राधिकरणाचे मुख्य प्रशासन अधिकारी अशोक मांडे यांनी पुन्हा सेलवन यांना पत्र दिले. त्यात आपण महाराष्ट्र नागरीसेवा (वर्तणूक) या नियमाचे उल्लंघन केले आहे. ७ डिसेंबरपर्यंत एकतर्फा कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी हजर झाले नाही, तर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. पालिकेलाही सेलवन यांना कार्यमुक्त करण्यात यावे, असे पत्र दिले. पण, पालिका दखल घेत नसल्याने आमदार बच्चू कडू यांनी पाणीपुरवठा मंत्री, प्राधिकरण आणि पालिका आयुक्त यांना नियमानुसार सेलवन यांना कार्यमुक्त करण्याचे निवेदन दिले. सर्व अधिकार्‍यांना फोन केल्यावर आयुक्त अच्युत हिंगे यांनी कलई सेलवन यांना कार्यमुक्त करून उपअभियंता चंद्रगुप्त सोनवणे यांच्याकडे पदभार सोपवला. याबाबत सेलवन यांच्याशी विचारणा केली असता, पालिकेकडे वारंवार कार्यमुक्त करण्याची विनंती केली होती. पण, आयुक्तांच्या वतीने प्राधिकरणाला पत्र पाठवून थांबवण्यात येत होते, असे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -