घरमुंबईआरेतील झाडांवर कुऱ्हाड पडताच पर्यावरणप्रेमी संतापले; पोलिसांनीही केली धरपकड

आरेतील झाडांवर कुऱ्हाड पडताच पर्यावरणप्रेमी संतापले; पोलिसांनीही केली धरपकड

Subscribe

आरेतील वृक्षतोडीविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेमध्ये रात्रभर झाडं कापण्यात आली. काल, शुक्रवारी संध्याकाळपर्यंत जवळपास ३५० हून अधिक झाडांवर कुऱ्हाड फिरवण्याची माहिती तेथील स्थानिकांनी दिली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस सुरक्षाही या परिसरात उपस्थित होती. पर्यावरण प्रेमींना याची माहिती मिळताच त्यांनी आरेमध्ये धाव घेत झाडं कापण्याला तीव्र विरोध केला. आंदोलने करत झाडांची कत्तल करण्यास अटकाव केला. या सर्व परिस्थितीमुळे रात्रभर आरेत तणावाचे वातावरण होते. येथे उपस्थित पोलिसांनी काही आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

aarye
आरेतील झाडांची कत्तल

- Advertisement -

काय घडले रात्रीच्या अंधारात 

आरे मेट्रो कारशेड प्रकरणी शुक्रवारी हायकोर्टाचा निकाल लागताच संध्याकाळी सातच्या सुमारास झाडे कापायला सुरुवातही झाली. पर्यावरण प्रेमी आणि ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांना याचा सुगावा लागला. शेकडोंच्या संख्येने त्यांनी आरेत प्रवेश केला. यावेळी पोलिसांनी त्यांना आडवण्याचा प्रयत्न केला. ‘आरे वाचवा’ मोहिमेच्या आंदोलकांनी आरेतील वृक्षतोड थांबवण्यासाठी तिथेच धरणे आंदोलन सुरू केले. मात्र पोलिसांनी एक-एक करून आंदोलकांना ताब्यात घेतले. वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात आंदोलकांना नेण्यात आले. तरीही अनेक आंदोलक आरेमध्ये सरकारविरोधात घोषणाबाजी देत ठाण मांडून होते. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना परतण्याचं आवाहनही केले. अखेर रात्री तीन वाजेच्या सुमारास सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. यानंतर आरेमध्ये पुन्हा झाडं कापण्याचे काम सुरू झाले होते. आज, शनिवारी सकाळी या आंदोलनकर्त्यांना सजम देऊन सोडून देण्यात आले.

aarye
आरेतील झाडांची कत्तल

- Advertisement -

दरम्यान, रात्री घडलेल्या प्रकारानंतर आज सकाळपासूनच आरे परिसराला छावणीचे स्वरूप आले आहे. मोठ्या प्रमाणात अजूनही पोलिसांचा फौजफाटा येथे उपस्थित आहे. तर आरेचा मुलुंडकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. तसेच वेस्टर्न हायवेवरही टप्प्या टप्प्यावर आंदोलनकर्त्यांसाठी पोलिसांनी अटकाव करणारी यंत्रणी उभी केली आहे. या परिसरात एकत्र जमण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

हेही वाचा –

मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -