घरमुंबईपूर्ववैमनस्यातून वशिष्ठ यादवची हत्या; दोन जणांना अटक

पूर्ववैमनस्यातून वशिष्ठ यादवची हत्या; दोन जणांना अटक

Subscribe

उल्हासनगरमध्ये दिवसाढवळ्या करण्यात आलेल्या हत्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. सेल्समन वशिष्ट यादव याची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली होती. तीन ते चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या हत्येचा बदला म्हणून वशिष्ठ याची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलिसांनी अवघ्या काही तासामध्ये दोघांना अटक केली आहे.


हेही वाचा – उल्हासनगरात दिवसाढवळ्या तरुणाची हत्या

- Advertisement -

नेमकी काय आहे घटना?

सोमवारी दुपारी ३ च्या सुमारास वशिष्ठ यादव या सेल्समनचा व्यवसाय करणाऱ्या तरुणाची कॅम्प २ येथे हत्या करण्यात आली होती. वशिष्ठ आवतमल चौक झुलेलाल मंदीरसमोरील रोडवरून पायी चालत जात होता. तेव्हा निषाद यांच्या टोळीने वशिष्ठला भर रस्त्यात गाठले आणि त्याच्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करून ठार मारले. मंगळवारी सकाळी यादव कुटुंबियानी वशिष्टचे पार्थिव ताब्यात घेऊन त्यांच्या आझादनगर निवासस्थानी नेले. मात्र जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, असा पवित्रा त्याच्या नातेवाईकांनी घेतला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय जमला होता. जनआक्रोश होण्याच्या धास्तीने पोलिसांनी घटनास्थळी बंदोबस्त तैनात केला होता. २४ तासांच्या आत आरोपींना बेडया ठोकण्यात येणार असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर वशिष्ठच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

पूर्ववैमनस्यातून वशिष्ठची हत्या

दरम्यान, वशिष्ठ यादव याचा चुलत भाऊ बिपिन यादव याने सुंदरम निषाद याचा खून केला होता. त्या पूर्ववैमन्स्यातून निषाद टोळीने वशिष्ठ यादव याचा खून केला. या खुनामागे संदिप निषाद आणि नूर अंसारी यांची नावे समोर आल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन तडाके, उपनिरीक्षक संतोष म्हस्के, गुन्हे शोध प्रकटीकरणचे वसंत डोळे, अर्जुन मुत्तलगीरी, मिलिंद बोरसे, पी.एन.आव्हाड यांनी तपासाचे जाळे पसरवून या दोघांना मंगळवारी रात्री उशीराने शहाड पुलाखाली अटक केली. या प्रकरणातला मुख्य आरोपी शिवम निषाद अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -