घरमुंबईवज्रमूठ सभा संपल्या...; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

वज्रमूठ सभा संपल्या…; नाना पटोले यांचे मोठे वक्तव्य

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला. यानंतर महाविकास आघाडीच्या (MVA) उर्वरित चार सभा होणार नसून ‘वज्रमूठ’ (Vajramuth) सुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. या पार्श्वभूमीवर कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, वज्रमूठ सभा संपल्या आहेत, असे गृहीत धरू नका.

नाना पटोले म्हणाले की, सध्या अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात अस्मानी संकट सुरू आहे. गारासह पाऊस येतो आहे. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात जी काही अवस्था झाली आहे, त्यावर प्रकाश टाकण्याची गरज आहे. सगळीच वाताहात निसर्गाने महाराष्ट्रामध्ये करून ठेवली आहे आणि त्याच्यावर सरकार काही बोलायला तयार नाही आहे. यासंदर्भात आम्ही राज्यपालांकडे गेलो होतो.

- Advertisement -

राज्यातील परिस्थिती पाहता मुंबईच्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंशी माझे बोलणे झाले आहे. सध्या जे काही नैसर्गिक वातावरण आहे. या वातावरणावर निर्णय घेण्यासाठी आम्ही बैठक घेणार आहोत. त्यामुळे वज्रमूठ सभा संपल्या, असे तुम्ही गृहीत धरू नका. सध्या जिल्ह्यात चक्रीवादळामुळे घरे उडून गेले आहेत, जीवितहानी झाली आहे, पिकांचा चिखल झाला आहे. ही सर्व परिस्थिती महाराष्ट्रात सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये सभा घ्यायच्या आणि त्या सभांचे वातावरण राहिलं तर त्याला काय करायचं. त्यामुळे या सर्व गोष्टींची महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईतील यशवंतराव सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली होती, त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ऊन, पाऊस, वादळ, अवकाळी पाऊस काहीही असो या सभा होणारच, असा निर्धार व्यक्त केला होता. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऊन्हाचेच कारण दिले आहे. सध्या उन्हाची वाढती तीव्रता पाहता वज्रमूठ सभेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी 28 मेची सभा होणारच, असे ठामपणे सांगितले. मात्र त्याआधी पुण्याला 14 मे रोजी वज्रमूठ सभा होणार का? आणि पुढील सभाही होणार का? हे स्पष्ट होत नाही आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -