घरमुंबई...काळ्या फिती बांधून साजरा करणार दहीहंडी उत्सव!

…काळ्या फिती बांधून साजरा करणार दहीहंडी उत्सव!

Subscribe

रस्त्यांच्या दुरवस्थेच्या निषेधार्थ काळ्या फिती बांधून दहीहंडी उत्सव साजरा करून आंदोलनाचा इशारा मनसेचे शहर अध्यक्ष सचिव सुरसे यांनी दिला आहे.

अंबरनाथच्या शिवगंगा नगर परिसरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यासंदर्भात वारंवार निवेदने देऊनही नगर परिषद प्रशासन त्याची दखल घेत नसल्याने काळ्या फिती बांधून दहीहंडी साजरी करण्याचा इशारा मनसेचे शहर सचिव अविनाश सुरसे यांनी दिला आहे. शिवगंगा नगर, अंबरनाथ पूर्व येथील मुख्य प्रवेश द्वाराजवळील रस्ता आणि साईबाबा मंदिर, बुद्ध विहार समोरील रस्ता याची खड्ड्यामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार पडले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी देविदास पवार यांना निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. त्यावर त्यांनी लवकरात लवकर रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. मात्र प्रत्यक्षात कोणतेही काम करण्यात आलेले नाही. त्यामुळे २४ ऑगस्टपर्यंत रस्ते खड्डेमुक्त न झाल्यास दहीहंडीखालीच निषेध आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानुसार शनिवारी शिवगंगा नगर परिसरातील सर्व नागरिक काळ्या फिती बांधून दहीहंडी उत्सव साजरा करून निषेध आंदोलन करणार असल्याची माहिती अविनाश सुरसे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -