घरताज्या घडामोडीCoronaVirus: ...तर मुंबईत मिलिट्रीला बोलवावे लागेल - महापौर किशोरी पेडणेकर

CoronaVirus: …तर मुंबईत मिलिट्रीला बोलवावे लागेल – महापौर किशोरी पेडणेकर

Subscribe

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० हजारहून अधिक झाली आहे. त्यामुळे आज सायंकाळपासून काटेकोर निर्बंध लावले गेले आहेत. मुंबईतील कोरोना विषाणूच्या वाढत्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना निर्वाणीचा इशारा महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिला आहे. जर नियमांचे पालन केले नाहीतर मिलिट्रीला बोलाववे लागेल आणि त्यामुळे नागरिकांच्याच अडचणी वाढतील, असे किशोरी पेडणेकर यांनी मत व्यक्त केले.

महापौर म्हणाल्या की, सध्या आव्हान मोठे आहे. जर नागरिकांनी साथ दिली तर आपली यंत्रणा आव्हानाला यशस्वीपणे सामोरे जाईल. नागरिकांनी उगाच कारण नसतानाही घराबाहेर पडू नये. जर आपल्याला काही कारणाने मिलिट्रीला बोलवावे लागेल तर त्यामुळे अजूनच अडचणी वाढतील. आता काही प्रमाणात जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाहेर जाता येत आहे. मात्र मिलिट्रीला बोलवल्यानंतर सर्व सोयी सुविधा बंद होतील. त्यामुळे नागरिकांनी एकमेकांना समजून घ्यावे आणि तसेच वागावे.

- Advertisement -

यादरम्यान किशोरी पेडणेकर यांनी कोरोना उपचाराच्या नावाखाली खासगी रुग्णालयात सुरू असलेल्या लुटीवरही नाराजी व्यक्त केली. खासगी रुग्णालयात कोरोनावर कोणतेही औषध नसतानाही सहा लाख रुपयांचे बील होत असेल तर ते चुकीचे आहे, असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या.


हेही वाचा – विधानपरिषद निवडणूक: काँग्रेस दोन तर महाविकास आघाडी सहा जागा लढविण्याच्या तयारीत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -