घरCORONA UPDATECorona Live Update: कोरोनाबाधित, कोरोना योद्ध्यांशी उद्या पंतप्रधान बोलणार

Corona Live Update: कोरोनाबाधित, कोरोना योद्ध्यांशी उद्या पंतप्रधान बोलणार

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने कोरोनाचा संसर्ग झालेले रुग्ण आणि कोरोना योद्ध्यांशी संवाद साधणार आहेत. हा कार्यक्रम व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे कोरोनाच्या फ्रंटलाइन वॉरियर्सच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आलेला आहे.

- Advertisement -

 


ठाणे महापालिका क्षेत्रात बुधवारी नवीन ४६ रूग्णांची भर पडली त्यामुळे करोनाबाधित रूग्णांचा आकडा ४९६ झाला आहे.  आज सर्वाधिक १५ रूग्ण वागळे प्रभाग समितीत सापडले. महापालिका क्षेत्रातील दहा प्रभगा समितीपैकी  लोकमान्यनगर सावरकरनगर  प्रभाग समितीत सर्वाधिक १०४ रूग्ण झाले आहेत. त्याखालोखाल वागळे प्रभाग समिती ९६ रूग्ण, मुंब्रा प्रभाग समिती ७०, नौपाडा कोपरी ५१, कळवा ४६,  वर्तकनगर ३७, माजीवडा २९ . दिवा प्रभाग समिती २३ रूगण आहेत. आतापर्यंत १८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे तर उपचार घेऊन बरे होणा-या रूग्णांची संख्या ९४ इतकी आहे.

- Advertisement -

कोरोनाच्या संकटकाळातही भाजपकडून गोरगरिबांची फसवणूक केली जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. केंद्र सरकारने स्थलांतरीत मजुरांना आपापल्या गावी परत जाण्याची परवानगी दिली. मात्र, राज्य सरकारने त्यांच्याकडून पैसे घेऊन रेल्वेकडे जमा करावेत, असा अत्यंत असंवेदनशील निर्णय घेतला आहे. या असंवेदनशीलतेवर अत्यंत अस्वस्थ होऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देश पातळीवर स्थलांतरीत मजुरांचा या अत्यंत दुर्दैवी परिस्थीतीत होणारा घर परतीचा खर्च हे त्या-त्या राज्यातील प्रदेश काँग्रेस करेल, असा निर्णय घेतल्याचे सावंत म्हणाले.


केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आपल्या संकेतस्थळावर कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी दिलेली आहे. देशात कोरोनाचा संसर्ग झालेले ४९ हजार ३९१ रुग्ण आहेत. तर १,६९४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. तर आनंदाची बाब म्हणजे १४ हजार १८३ लोकांनी कोरोनावर मात केली असून ते बरे झाले आहे.


राज्यातल्या २५ हजार खासगी डॉक्टरांना १५ दिवसांसाठी सरकारी रुग्णालयात कोरोनावर उपचारांसाठी सेवा देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.


कल्याण-डोंबिवलीमधून मुंबईत नोकरीसाठी जाणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत प्रवेशास मनाई करण्याचा निर्णय काल म्हणजेच मंगळवारी जाहीर झाला होता. मात्र, आता तो निर्णय कडोंमपाने तात्पुरता स्थगित केला आहे.


मगळवारी एकाच दिवसात राज्यात ८४१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून ३४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णांसोबत राज्यातल्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १५ हजारांच्या वर गेली आहे.


देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर झालेला असताना तेलंगणा सरकारने आत्ताच २९ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तेलंगणामध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ हजारांच्या वर गेली आहे.


देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा ४९ हजारांच्याही वर गेला असून लवकरच तो ५० हजारांचा आकडा गाठेल अशी शक्यता आहे. यापैकी ३५ हजार ५१४ अॅक्टिव रुग्ण असून १४ हजार १८२ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आत्तापर्यंत १६९४ लोकांचा कोरोनामुळे देशात मृत्यू ओढवला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -