घरमुंबईपोलिसांनो, ताण घेऊ नका, स्ट्रेस बॉल घ्या!

पोलिसांनो, ताण घेऊ नका, स्ट्रेस बॉल घ्या!

Subscribe

पोलिसांवरील वाढत्या कामाच्या ताणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक ह्रदय दिनानिमित्ताने वोक्हार्ट रुग्णालयाने ५००० पोलीस आणि खासगी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना स्ट्रेस बॉलचं वाटप केलं.

येत्या २९ तारखेला असलेल्या जागतिक हृदयदिनाच्या निमित्ताने, ताण आणि उच्च रक्तदाबामुळे वाढलेल्या हृदयविकारांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रूग्णालयाने खासगी कंपन्या आणि पोलिस खात्यातील ५००० हून अधिक कर्मचाऱ्यांना ‘स्ट्रेस बॉल’ वाटले आहेत. मंगळवारी आग्रीपाडा पोलिस स्थानकात पोलिसांना स्ट्रेस बॉलच्या मदतीने कशा पद्धतीने तणावावार नियंत्रण मिळवता येईल? याचे प्रात्यक्षिकही दाखवून त्यांचं वाटप करण्यात आलं. ताणाची पातळी आणि हृदविकाराच्या धक्क्यांचा वाढता दर यांच्यामधील संबंध गेल्या १५ वर्षांत झालेल्या अनेक अभ्यासांतून दिसून आला आहे. या पार्श्वभूमीवर वोक्हार्ट रुग्णालय प्रशासनानं हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला.

खासगी कंपन्यांतील कर्मचारी तसेच पोलिसांना या मोहिमेतून आम्ही आवाहन करतो की एक व्यक्ती म्हणून अधिक क्रियाशील व्हा. धूम्रपान टाळा, निरोगी आहार घ्या, नियमित व्यायाम करा आणि कायम तणावमुक्त राहा. त्यामुळे तुमचे ह्रदय निरोगी राहील. कुठल्याही प्रकारचा ताण घेऊ नका.

डॉ. पराग रिंदानी, वोक्खार्ट हॉस्पिटलचे प्रमुख

पोलिसांवर कामाचा अधिक ताण

जीवनशैली, तणाव, कामाचा दीर्घ कालावधी आणि व्यायामाचा अभाव यामुळे येणारे हृदयविकाराचे झटके ही मृत्यूंमागील प्रमुख कारण आहे. गेल्या काही वर्षांपासून तरुणवर्ग कमी वयातच हृदयविकारांचा सामना करू लागला आहे, असे दिसून आले आहे. त्यातही पोलिसांचा कामाचा कालावधी दीर्घ असतो. त्याच्यात बाहेरचे जंक फूड खाण्याचे प्रमाण देखील अधिक असते. यासोबतच ताणापासून मुक्ती मिळवण्याचा धुम्रपान हा सर्वोत्तम मार्ग आहे, असा गैरसमज आहे. धुम्रपानामुळे प्रत्यक्षात ताण हलका होत नाही. कामाच्या दीर्घ कालावधीमुळे व्यायामासाठी वेळ मिळत नाही आणि त्यात ताणाचा परिणाम आरोग्यावर होतो. मात्र हा स्ट्रेस बॉल दाबल्यामुळे आपण मोकळे होतो. त्यामुळे मन आणि शरीरावरील ताण तुलनेने कमी होतो.

- Advertisement -

कसा वापरायचा स्ट्रेस बॉल?

  • तुमच्या हाताच्या पंजात मावेल असा स्ट्रेस बॉल किंवा छोटे सॉफ्ट टॉय घ्या
  • हा बॉल एका पंजात धरा आणि तो ९० सेकंद मुठीत घेऊन दाबत राहा
  • मग तो दुसऱ्या हाताच्या पंजात घ्या आणि ९० सेकंद दाबत राहा
  • हा व्यायाम दोन्ही हातांनी प्रत्येकी तीन वेळा करा
  • दिवसांतून दोनदा, असे ६ आठवडे हा व्यायाम करा
  • ६ आठवड्यांनंतर रक्तदाब तपासा

तुम्हाला हे माहिती आहे का? – मुंबईकरांमध्ये वाढतंय उच्च रक्तदाबाचं प्रमाण!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -