घरमुंबई'क्राईम पेट्रोल'ने मिळाली प्रेरणा; अशी केली वृद्धेची हत्या

‘क्राईम पेट्रोल’ने मिळाली प्रेरणा; अशी केली वृद्धेची हत्या

Subscribe

दागिन्याच्या मोहाने पती - पत्नीने एका नातेवाईक असलेल्या वृद्धेची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारचाकी वाहन, दुचाकी गाडी, आयफोन, एअरकंडिशन अशा चैनीच्या वस्तू हप्त्यावर घेतल्यानंतर हप्ता भरण्यासाठी भासू लागलेली आर्थिक चणचण दूर करण्यासाठी एका वृद्ध नातेवाईक महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना ठाणे येथे घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सोमनाथ वाकडे आणि नीलम वाकडे या दोघांना बेड्या ठोकल्या असून पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या मालिकांमधून या जोडप्याला प्रोत्साहन मिळाले असल्याची बाब चौकशीतून पुढे आली आहे.

नेमके काय घडले?

२२ नोव्हेंबर रोजी हिवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत तोंड बांधलेल्या अवस्थेत वृद्धेचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तिचे शवविच्छेदन केले असता डोक्यात जड वस्तूच्या प्रहाराने वृद्धेचा मृत्यू झाल्याचे समोर आले. भिवंडी पोलीस ठाण्यात अज्ञात वृद्धेच्या हत्येप्रकरणी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच वृद्ध हरविल्याची तक्रार अन्य पोलीस ठाण्यात दाखल आहे का याची खात्री केल्यानंतर चौधरपाडा, बापगाव येथील रहिवाशी सोनुबाई कृष्ण चौधरी (७०) हरवल्याची तक्रार समोर आली. त्याचबरोबर सोनूबाई या एकट्या घरात राहणाऱ्या असल्याचे समोर आल्यांने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. गुन्ह्याची उकल करण्यासाठी तीन पोलीस पथके बनविण्यात आली. चौधरपाडा ते वडूनवघर दरम्यानचे प्रत्येक सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले आणि आसपासच्या लोकांकडे चौकशी केली. त्यात आरोपींचीही चौकशी पोलिसांनी केली. कारण ते सोनूबाईचे नातेवाईक होते. सोनूबाईच्या घरासमोर राहणाऱ्या सोमनाथ वाकडे याच्या संशयास्पद हालचालीने पोलिसांना संशय आला.

- Advertisement -

पोलिसांनी चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेताच पती-पत्नी सोमनाथ आणि नीलम यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी सोमनाथ रघुनाथ वाकडे आणि त्याची पत्नी नीलम यांनी बऱ्याच चैनीच्या वस्तू हप्त्यावर घेतल्या होत्या. त्याचा हप्ता भरणे पगारातून शक्य नव्हते. सोमनाथ चालक म्हणून खाजगी ठिकाणी काम करीत होता. डोक्यावरील कर्ज आणि हप्ता ही कटकट कायमची घालवण्यासाठी त्यांनी सोनूबाईच्या दागिन्यांकडे पाहून त्यांना लालच निर्माण झाली. त्यांच्या लालसेला क्राईम पेट्रोल आणि सावधान इंडिया सारख्या गुन्हेगारी सिरियलने प्रोत्साहन दिले. दरम्यान, पती-पत्नीने निर्णय घेतला की, सोनुबाईची हत्या करून तिचे दागिने घेऊन कर्जमुक्त व्हायचे. नातेवाईक असल्याने सोनुबाई ही सोमनाथ यांच्याघरी गप्पा मारण्यास येत होती. नेहमीप्रणाणे २१ नोव्हेंबर रोजी सोनुबाई त्यांच्या घरी गप्पा मारण्यास आली. त्यांच्या अंगावर सोन्याचे गंठण, चैन, मण्याची माळ आणि कानातील फुले असा २ लाख ९० हजाराचा मुद्देमाल होता. नीलमने अचानक कपडे धुण्याचा धोका घेऊन सोनूबाईच्या डोक्यात मारला आणि तिची हत्या केली. त्यानंतर त्यांच्या अंगावरील दागिने काढून घेतले. याबाबत सोमनाथला सांगताच सोमनाथने तिचा मृतदेह हा होंडासिटी कारमध्ये घेऊन तो वडूनवघर येथील तलावात नेऊन फेकला, अशी कबुली आरोपींनी स्थानिक गुन्हे शाखेला दिली. याप्रकरणी पोलिसांनी ८ डिसेंबर रोजी पती-पत्नी यांना अटक करून गुन्ह्यातील कार आणि दागिने असा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


हेही वाचा – धक्कादायक! पुन्हा एकदा सापडले बॅगेत मृतदेहाचे तुकडे!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -