घरनवी मुंबईखूशखबर! गुढी पाडव्याला येणार सिडकोची महायोजना; भूखंड, सदनिका, वाणिज्यिक गाळ्यांची विक्री

खूशखबर! गुढी पाडव्याला येणार सिडकोची महायोजना; भूखंड, सदनिका, वाणिज्यिक गाळ्यांची विक्री

Subscribe

सिडकोतर्फे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर विविध भूखंड, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्री महायोजनेचा शुभारंभ एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे.

सिडकोतर्फे गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवार, २ एप्रिल २०२२ रोजी विविध भूखंड, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गटासाठीच्या सदनिका आणि वाणिज्यिक गाळ्यांच्या विक्री महायोजनेचा शुभारंभ एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील वाणिज्यिक गाळे तसेच निवासी, वाणिज्यिक आणि सामाजिक उद्देशांसाठी भूखंड ई-लिलाव तथा ई-निविदा प्रक्रियेद्वारे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विविध योजनांच्या माध्यमातून सिडकोने पुन:श्च समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांसाठी समान संधी उपलब्ध करून दिली आहे. सिडकोने नेहमीच आपल्या विविध योजना व प्रकल्पांच्या माध्यमातून समाजाचा व शहराचा सर्वांगीण विकास साधण्यावर भर दिला आहे. वाणिज्यिक गाळे व वाणिज्यिक भूखंड विक्रीच्या या महायोजनेमुळे कोविड पश्चात रूळावर येत असलेल्या अर्थव्यवस्थेस अधिक गती मिळणार आहे.
– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री

- Advertisement -

नवी मुंबईतील खारघर, घणसोली, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी नोड्समध्ये या विविध योजना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. नवी मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या वाणिज्यिक गाळ्यांमुळे व्यावसायिकांना व्यवसाय सुरू करण्यासोबतच वृद्धिंगत करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच लहान व मोठ्या आकाराच्या निवासी आणि वाणिज्यिक भूखंडांमुळे बांधकाम विकासकांसह सर्वसामान्य नागरिकांनाही आपले हक्काचे घर साकारण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विविध सामाजिक उद्देशांकरिता मोठ्या प्रमाणावर भूखंड उपलब्ध करून देत सिडकोने आपला सर्वसमावेशक आणि समाजाच्या सर्वांगीण विकासाचा वारसा जपला आहे. याचबरोबर सिडकोच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमध्ये मध्यम उत्पन्न गट व उच्च उत्पन्न गटासाठी सदनिका विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमधील सिडकोच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनांमधील वाणिज्यिक गाळ्यांसोबतच उत्तर व दक्षिण नवी मुंबईतील विविध क्षेत्रफळांचे भूखंड व सिडकोच्या लोकप्रिय गृहनिर्माण योजनेतील सदनिका विक्रीकरता उपलब्ध करण्यात येणार आहेत. यामध्ये सामान्य नागरिकांपासून मोठ्या विकासकांपर्यंत सर्वांना निवासी, वाणिज्यिक, निवासी तथा वाणिज्यिक भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
– डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको

- Advertisement -

या योजनेतील वाणिज्यिक गाळ्यांची आणि भूखंडांची विक्री ही सुलभ आणि पारदर्शक अशा ई-निविदा तथा ई-लिलाव प्रक्रियेद्वारे पार पडणार आहे. याकरता https://cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच अर्ज नोंदणी, अनामत रक्कम व शुल्क भरणा, निविदा सादर करणे, लिलाव या सर्व प्रक्रियेची माहिती उपरोक्त संकेतस्थळासोबतच सिडकोच्या अधिकृत समाज माध्यमांवर वेळोवेळी देण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

हेही वाचा –

Maharashtra Covid 19 Restrictions : महाराष्ट्रातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटवले ; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -