घरनवी मुंबईस्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर काढणार

स्वच्छ सर्वेक्षणात देशात पहिला नंबर काढणार

Subscribe

'निश्चय केला, नंबर पहिला' हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

परीक्षेत मिळालेले गुण व नंबर उंचावत नेणे हे प्रत्येक विद्यार्थ्याचे ध्येय असते. त्यामुळे मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशात तिस-या क्रमांकाच्या स्वच्छ शहराचे लाभलेले मानांकन उंचावत यावर्षी ‘निश्चय केला, नंबर पहिला’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अधिक जोमाने काम करण्याचे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. त्याला प्रतिसाद देत स्वच्छता कार्यातील नागरिकांच्या सहभाग वाढीसाठी व स्वच्छतेविषयी जनजागृती करिता या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी यावर्षी शहर स्वच्छतेवर अधिक भर दिला जात असल्याने तसेच चौक, रस्ते, उड्डाणपूल येथील आकर्षक सुशोभिकरणामुळे नवी मुंबईचे रूप अधिक देखणे होत असल्याचे अभिप्राय नागरिकांकडूनच मिळत असल्याचे सांगितले. यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षणामध्ये नागरिकांच्या प्रतिसादाला गुणात्मकदृष्ट्या अत्यंत महत्व असून शहर स्वच्छतेविषयीच्या फोनवरून विचारल्या जाणा-या प्रश्नांना नागरिकांनी शहराच्या बदललेल्या स्वच्छ व सुशोभित रूपाविषयी शहराला नंबर वन बनविणारी उत्तरे द्यावीत असे आवाहन केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विष्णुदास भावे नाट्यगृह, वाशी येथे स्वच्छ सर्वेक्षण २०२१ च्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या स्वयंसेवी संस्था, मंडळे, महिला बचत गट यांच्या माहिती व जनजागृतीपर कार्यशाळेप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे उपस्थित होते.

- Advertisement -

याप्रसंगी बोलताना प्रशासन विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांनी २००२ पासून सातत्याने नवी मुंबई राज्यातील स्वच्छ शहरांमध्ये कायम एक नंबरला राहिली असून आता देशात एक नंबर पटकाविण्यासाठी सज्ज झालेली आहे असे सांगत स्वच्छतेचा वारसा जपणारे शहर ही आपली ओळख असून तो उंचावण्यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करण्याच्या पूर्वतयारीसाठी ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली असल्याचे सांगितले. यावर्षीच्या सर्वेक्षणामध्ये नागरिकांच्या सहभागाइतकेच नागरिकांच्या प्रतिसादाला महत्व असून नवी मुंबईकर नागरिक आता देशात पहिल्या नंबरचा निर्धार करूनच सर्वेक्षणासाठी येणा-या फोन कॉलवर आपल्या शहराविषयी अभिमानास्पद उत्तरे देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी आत्तापर्यंतच्या स्वच्छतेमधील नवी मुंबईच्या यशात नागरिकांचा संपूर्ण सहभाग महत्वाचा ठरला असून यावर्षी सर्वेक्षणाच्या बदललेल्या स्वरूपातही नवी मुंबईकर नागरिक शहराविषयीची आपली आपुलकीची भावना स्वच्छतेविषयीच्या ८ प्रश्नांना पैकीच्या पैकी मार्क देऊन व्यक्त करतीलअशी खात्री असल्याचे सांगितले.

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 च्या जिंगल रचयिता श्रीम. धनश्री देसाई यांनी आपण नवी मुंबईकर असल्याचा अभिमान व्यक्त करीत नवी मुंबई शहर पर्यावरणाची हानी करून विकास करीत नाही तर पर्यावरण व वसुंधरेला जपत विकास करते हे इतर शहरांपेक्षा नवी मुंबईचे वैशिष्टय असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या शहरात देशात प्रथम क्रमांक येण्याची क्षमता असल्याचे सगळ्यांनाच ठाऊक असून असे असताना आपण या शहराचे नागरिक म्हणून योगदान देताना कमी पडता कामा नये अशी भावना त्यांनी व्यक्त केली. स्वत: स्वच्छता राखाच शिवाय अस्वच्छता निर्माण करणा-यांना रोखा आणि त्यांच्यावरही स्वच्छतेचे संस्कार करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना व प्रत्येक नवी मुंबईकर नागरिकाला केले.

यावेळी जन्नत पथनाट्य समुहाने सादर केलेल्या पथनाट्यातून स्वच्छतेचा प्रचार करण्यात आला. आरंभ क्रिएशन्सने सादर केलेला स्वच्छतेचे पारंपारिक गोंधळ लोकगीत तसेच फॅशन स्टुडिओच्या कलावंतांनी सादर केलेल्या स्वच्छतागीतावरील नृत्याविष्काराला उपस्थितांनी प्रचंड दाद दिली. या कार्यशाळेच्या माध्यमातून ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हा निर्धार एकमुखाने घोषणा देत सर्वांनी सामुहिकरित्या व्यक्त केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -