घरनवी मुंबईविमानतळबाधितांना वितरित भूखंडांची माहिती एका क्लिकवर

विमानतळबाधितांना वितरित भूखंडांची माहिती एका क्लिकवर

Subscribe

सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटायजेशनच्या दिशेन नवे पाऊल टाकले आहे.सिडकोच्या महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के योजनेतील बांधकामधारकांची पात्रता यादी, वाटपित भूखंडांचा संचिका, गाव व बांधकामधारक निहाय तपशील, वाटपपत्र व करारनाम करण्यात आल्याचा दिनांक इ. सविस्तर माहिती https://cidco.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विमानतळबाधितांना घरबसल्या पात्रता यादी व भूखंड वाटपाची सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे. तसेच भूखंड वाटपाची प्रक्रियाही अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास यामुळे मदत झाली आहे.

नवी मुंबई: सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.संजय मुखर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटायजेशनच्या दिशेन नवे पाऊल टाकले आहे.सिडकोच्या महत्त्वाकांक्षी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पातील प्रकल्पबाधितांना २२.५ टक्के योजनेतील बांधकामधारकांची पात्रता यादी, वाटपित भूखंडांचा संचिका, गाव व बांधकामधारक निहाय तपशील, वाटपपत्र व करारनाम करण्यात आल्याचा दिनांक इ. सविस्तर माहिती https://cidco.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे विमानतळबाधितांना घरबसल्या पात्रता यादी व भूखंड वाटपाची सद्यस्थिती जाणून घेता येणार आहे. तसेच भूखंड वाटपाची प्रक्रियाही अधिक पारदर्शक व सुलभ होण्यास यामुळे मदत झाली आहे.
सिडकोच्यावतीने नवी मुंबईतील पनवेल तालुक्यामध्ये ११६० हेक्टरवर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणार्‍या १० गावांतील प्रकल्पबाधितांना महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले देशातील सर्वोत्तम असे पुनर्वसन आणि पुन:स्थापन पॅकेज सिडकोतर्फे देण्यात आले आहे. या पॅकेज अंतर्गत विमानतळ प्रकल्पबाधितांना पुष्पक नगर या पुनर्वसन आणि पुन:स्थापन क्षेत्रात २२.५ टक्के योजनेंतर्गत विकसित भूखंडांचे वाटप करण्यात येत आहे.

सिडकोच्या ई-प्रशासन उपक्रमातील हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत विमानतळबाधितांच्या सोयीसाठी सिडकोने ही माहिती ऑनलाईन उपलब्ध करून दिली आहे. यामुळे प्रकल्पातील भूखंड वाटप प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ झाली आहे. प्रकल्पबाधितांच्या प्रति सिडको पारदर्शकता आणि निष्पक्षता या उद्देशासाठी वचनबद्ध आहे.
-डॉ.संजय मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक- सिडको

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -