Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर नवी मुंबई पालकमंत्री एकनाथ शिंदेंविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर  

पालकमंत्री एकनाथ शिंदेंविषयी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीचा सूर  

ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी नवी मुंबईतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे.

Related Story

- Advertisement -
ठाणे जिल्ह्यातील पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयी नवी मुंबईतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची कामे करणाऱ्या स्थानिक ठेकेदारांमध्ये आता ठाण्याचे ठेकेदार शिरल्याने इथल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये नाराजीला सुरुवात झाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आमचे ठेके गेले, कामे गेली आणि आम्ही बोलू देखील शकत नाही, काय करू देखील शकत नाही, अशी जोरदार चर्चा सध्या इथल्या नेत्यांमध्ये आहे.
ठाणेकरांच्या फोनमुळे मनपाच्या अधिकाऱ्यांची मोठी अडचण झाल्याची चर्चा मनपा वर्तुळात सुरू आहे. नवी मुंबई महानगरपालिकेचा कारभार पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हाती असल्यामुळे नवी मुंबईतील काँग्रेस, राष्ट्रवादी तर नाराज आहेच मात्र शिवसेनेचेच आजीमाजी नगरसेवक सुद्धा नाराज असल्याचे बोलल जात आहे. नवी मुंबईतील महाविकास आघाडी मधील कुठल्याच नेत्यांची काम होत नसल्यामुळे हे सर्व नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे नवी मुंबई मध्ये आले तर कोणत्याही काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारत नाहीत तसेच त्यांची कामे ही करत नाहीत, अशी धारणा नवी मुंबईतील काँग्रेस व राष्ट्रवादीची झाली आहे. त्यामुळे नवी मुंबईत महाविकास आघाडीमधील घटक पक्षातील नेते नाराज आहेत.
नवी मुंबईतील शिवसैनिक हे नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये एखादा ठेका मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत असतात. रोज फाईल वर खाली करून कामे पास करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा करत असतात मात्र शेवटच्या क्षणी ठाणेकरांचा ठेकेदार येतो आणि काम घेतो मात्र वरिष्ठ नेत्यांसमोर काही बोलू शकत नाही, त्यामुळे सगळे गप्प आहेत. इतकी दयनीय अवस्था ठाणेकरांनी नवी मुंबईतील शिवसेने सह इतर पक्षातील नेते व कार्यकर्त्यांची करून ठेवल्याचे बोलले जातंय. त्यामुळे अस्वस्थ झालेले नवी मुंबईतील शिवसेनेसह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी आगामी निवडणुकीत काम करतील का? नवी मुंबईतील जनता या वेळी शिवसेनेला निवडून देते की नाही, असा प्रश्न नवी मुंबईतील शिवसेनेसह महाविकास आघाडीतील घटकपक्षांना पडला आहे.
- Advertisement -