घरनवी मुंबईमोरबे धरणावर (Morbe dam) विनापरवाना जलपूजन; गुन्हे दाखल करा

मोरबे धरणावर (Morbe dam) विनापरवाना जलपूजन; गुन्हे दाखल करा

Subscribe

काँग्रेसचे पालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन

 

नवी मुंबई-
महापालिकेच्या मालकीच्या मोरबे धरणाने (Morbe Dam eshu) १०० टक्के पातळी गाठल्यानंतर पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पुर्व माहिती देऊन लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्याची पालिकेची प्रथा आहे. मात्र असा नियम असताना प्रतिबंधित असलेल्या मोरबे धरणाच्या अंर्तगत क्षेत्रात प्रवेश करुन माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक त्याच प्रमाणे इतर माजी नगरसेवकांनी जलपूजन केले. केवळ प्रसिध्दीसाठी हा प्रकार करुन पालिकेच्या नियमांना बगल दिली आहे. या गंभीर प्रकरणी संबंधीतावर गुन्हे दाखल करण्याची मागणी करीत काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनात ठिय्या (Congress stayed in the commissioner’s hall) आंदोलन केले.

- Advertisement -

या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, शहर प्रवक्ता व कामगार नेते रविंद्र सावंत, एनएसयुआयचे अध्यक्ष मल्हार देशमुख, माजी नगरसेविका मीरा पाटील, जिल्हा सचिव विद्या भांडेकर, अरविंद नाईक, आबा सोनवणे, सचिन नाईक, रामराजे, नसीर हुसेन, मानवतकर आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

मोरबे धरण पुर्ण भरल्यानंतर धारण क्षमता लक्षात घेता प्रशासनाकून त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला.प्रथे प्रमाणे पालिकेने मंगळवार २६ सप्टेंबर रोजी जलपुजन नियोजित केले होते. परंतु माजी खासदार व महापौरांनी पालिकेची कोणतीही पुर्व परवानगी न घेता राजकीय श्रेयासाठी त्या आधीच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करुन जलपूजन केले. हा प्रकार म्हणजे पालिकेच्या नियमांची पायमल्ली करणारा असून सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे. मोरबे धरण हे कोणाच्याही खाजगी मालकीचे नसून नवी मुंबईकरांच्या मालकीचे आहे. हक्काचे मोरबे धरण असणारी एकमेव महापालिका म्हणून नवी मुंबईची महाराष्ट्रात नावलौकीक आहे. परंतु या प्रकारामुळे पालिकेची प्रतिमा मलिन झाली आहे. केवळ राजकीय स्वार्था पोटी घडलेल्या या प्रकारावर पालिका आयुक्त नार्वेकर यांनी गांभीर्याने लक्ष घालून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलन केल्याचे प्रवक्ता रविंद्र सावंत यांनी सांगितले.

- Advertisement -

कार्यकारी अभियंत्यांचे खालापूर पोलिसांना पत्र
मोरबे धरण पूर्ण भरताच रविवारी त्याठिकाणी परस्पर जलपूजन उरकल्याची धक्कादायक माहिती सर्वत्र पसरल्याने खळबळ उडाली होती. जलपूजन करताना प्रशासनाची कोणतेही परवानगी घेतली नसल्यामुळे संबधितांवर कारवाई करण्याचे पत्र कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे यांनी खालापूर पोलिस ठाण्यात दिले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -