घरनवी मुंबईनमुंमपाचे मालमत्ताकर (property tax recovery) वसूलीसाठी विभागनिहाय लक्ष्यांक

नमुंमपाचे मालमत्ताकर (property tax recovery) वसूलीसाठी विभागनिहाय लक्ष्यांक

Subscribe

अधिकार्‍यांनी हालगर्जीपणा केल्यास कारवाई ; १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत २३५ कोटींची वसुली

नवी मुंबई-मालमत्ता कर हा पालिकेच्या (Nmmc Main source of income)  उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असून यामधून प्राप्त होणार्‍या महसूलातूनच पालिका क्षेत्रातील नागरी सेवा सुविधा दर्जेदारपणे पुरविणे शक्य होते. त्यामुळे पालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मालमत्ताकर वसूलीसाठी बारकाईने लक्ष दिले आहे. या अनुषंगाने मालमत्ताकर विभागाच्या प्रमुख तथा अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभाग अधिकारी, कर्मचार्‍यांची विशेष बैठक घेतली. वसूलीचा विभागनिहाय लक्ष्यांक (Department wise target number for sample property tax recovery) देत गतीमान कार्यवाहीचे निर्देश दिले. त्याचप्रमाणे जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करताना आढळतील त्यांच्यावर कारवाईचे संकेत ढोले यांनी दिले.

दर आठवडयाला कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचा स्वत: आढावा घेणार असल्याचे सांगत त्यांनी शहर विकासात मालमत्ताकराचे महत्व लक्षात घेऊन प्रत्येकाने वसुली निर्देशांक नजरेसमोर ठेवून काम करा, अशा सूचना सुजाता ढोले यांनी दिल्या. चालू आर्थिक वर्षात अर्थसंकल्प सादर करताना आयुक्तांनी मालमत्ताकर विभागास ८०० कोटी रक्कमेचे उद्दिष्ट दिले आहे. त्यानुसार मालमत्ताकर विभागाकडून चालू आणि थकीत मालमत्ताकर वसूली करण्याकडेही विशेष लक्ष दिले आहे. ज्यादा रक्कमेच्या थकबाकीदारांपासून उलटया क्रमाने थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात मोठया रक्कमेच्या थकबाकीदारांकडील वसूली केली जाईल.

- Advertisement -

नवीन मालमत्ता कक्षेत आणणार
या आर्थिक वर्षात १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत २३५ कोटी रक्कमेची मालमत्ताकर वसूली करण्यात आली आहे. यामध्ये वाढ होण्याच्या दृष्टीने थकबाकी वसूलीकडे प्राधान्याने लक्ष दिले जात असून त्यासोबतच नवीन मालमत्ता देखील मालमत्ताकराच्या कक्षेत आणण्यावर भर दिला जात आहे. तर एमआयडीसी भागातील थकबाकी वसूलीवरही लक्ष केंद्रीत
करण्यात आले आहे.

कर्मचार्‍यांचे कामाचे नियोजन
थकबाकीदारांच्या विभागनिहाय याद्यांचा आढावा घेत संबंधित कर्मचारी यांनी दोन दिवस कार्यालयीन कामकाज, दोन दिवस थकबाकी वसूली आणि एक दिवस जप्ती विषयक कामे अशी साप्ताहिक कार्यप्रणाली निश्चित करुन वसुलीसाठी नियोजन केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -