घरनवी मुंबईरविवारी एक साथ, एक तास श्रमदान!

रविवारी एक साथ, एक तास श्रमदान!

Subscribe

२६७ ठिकाणी ‘स्वच्छांजली’ उपक्रमाचे भव्यतम स्वरूपात आयोजन

नवी मुंबई-:
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या देशव्यापी आवाहनानुसार स्वच्छतेमध्ये नेहमीच अग्रेसर असणार्‍या नवी मुंबई महानगरपालिकेने हा ‘स्वच्छांजली’ उपक्रम भव्यतम स्वरूपात आयोजनाकरिता तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Sindhe) यांनी दिलेल्या निर्देशानुसार स्वच्छतेची लोकचळवळ उभी रहावी या हेतूने नवी मुंबई पालिका क्षेत्रातील शाळा, महाविद्यालये, उद्याने, स्टेशन, डेपो, मार्केट, आरोग्य केंद्रे, नाला परिसर, पडीक जागा अशा तब्बल २६७ ठिकाणी रविवार १ ऑक्टोबर रोजी, सकाळी १० वाजता विशेष स्वच्छता मोहिमेचे (Navi Mumbai Cleanliness) आयोजन केले आहे.

स्वच्छता’ ही सेवा उपक्रमात प्रत्येक नागरिकाने भारत सरकारच्या https://swachhatahiseva.com/ या वेब पोर्टलवर आपल्या नावाची नोंद करून या उपक्रमात सहभागी व्हावे. नवी मुंबईकरांनी एक तास स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याकरिता द्यावा आणि स्वच्छतेविषयी असलेली आपली सामाजिक जबाबदारी पार पाडावी तसेच नवी मुंबई शहराप्रती असलेले प्रेम व्यक्त करावे असे आवाहन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे.

- Advertisement -

ऑनलाईन सहभागी व्हा,प्रमाणपत्र मिळवा
वेब पोर्टलवर लिंकवर क्लिक केल्यानंतर एक गुगल फॉर्म प्रदर्शित होतो. त्यामध्ये आपले नाव, पुरूष व स्त्री तपशील, भौगोलिक स्थान (URBAN), राज्य, जिल्हा, शहर अशी माहिती दाखल करून आपला एक सेल्फी फोटो काढून दाखल (SUBMIT) करावयाचा आहे. त्यानंतर काही क्षणातच आपणास आपले सहभाग प्रमाणपत्र ऑनलाईनच प्राप्त होणार आहे. अशाच प्रकारे क्यू आर कोड स्कॅन करूनही नाव नोंदणी केली जाऊ शकते व आपले सहभाग प्रमाणपत्र प्राप्त केले जाऊ शकते.

संपूर्ण नवी मुंबई शहरातील नागरिकांना स्वच्छतेच्या धाग्याने जोडणारा हा उपक्रम असून नवी मुंबईकर नागरिक मोठ्या संख्येने  १ ऑक्टोबरला या विशेष स्वच्छता मोहीमेत सहभागी होत पुन्हा एकवार नवा विक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. या उपक्रमांमध्ये लोकप्रतिनिधी तसेच स्वयंसेवी संस्था व मंडळे यांचे प्रतिनिधी, महिला संस्था व महिला बचत गटांचे प्रतिनिधी, शाळा महाविद्यालये यांचे विद्यार्थी व शिक्षक आणि पालक, विविध संघटनांचे प्रतिनिधी यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

- Advertisement -

राजेश नार्वेकर, नमुंमपा आयुक्त

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -