घरनवी मुंबईऐरोलीत बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महिलांचे विशेष पथक

ऐरोलीत बेकायदा फेरीवाल्यांना हटविण्यासाठी महिलांचे विशेष पथक

Subscribe

महिला कर्मचार्‍यांचे विशेष पथक नेमण्यात आल्याने ऐरोली विभागात या कारवाईला वेग आल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली जी विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र संप्रे यांनी ही धडक कारवाई केली.

स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेच्या जी विभागाच्या वतीने अनाधिकृतपणे फेरीवाले, प्लास्टिक पिशव्यांचा वापर, मार्जीनल स्पेस जागेत वेदरशेड अभारणारे लहान मोठे व्यवसायिक तसेच बेकायदा फेरीवाले हटविण्यासाठी महिला आधिकारी आणि कर्मचार्‍यांचे विशेष मोहीम पथक स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार या महिला पथकाने या धडक मोहिमेत दंडात्मक कारवाई केली.

ऐरोली सेक्टर १६ आणि १९ येथील या महिला कर्मचार्‍यांनी एकूण ३८ दुकांनामध्ये पाहणी केली. यावेळी दोषी आढळलेले दुकानदार, फेरीवाले, प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणारे तसेच मार्जिनल स्पेसवर कारवाई करुन एकूण १२ हजार ७५० रुपयांची दंडात्मक वसुली करण्यात आली. महिला कर्मचार्‍यांचे विशेष पथक नेमण्यात आल्याने ऐरोली विभागात या कारवाईला वेग आल्याचे चित्र पहावयास मिळाले. महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या आदेशानुसार अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त अमरिश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ऐरोली जी विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र संप्रे यांनी ही धडक कारवाई केली. विशेष मोहीम राबविण्यासाठी ऐरोली विभाग कार्यालयातील कर्मचारी सीमा विश्वे, तृप्ती जगताप, वंदना भुसरा, शिंगवे यांनी मेहनत घेतली.

- Advertisement -

फेरीवाले मार्जिनल स्पेस, फळ, भाजीवाले, चिकण मटण विक्रेते मासळी विक्रेते तसेच किरणा कटलरी मालाचे होलसेल आणि किरकोळ दुकानदार यांनी स्वच्छ सर्वेक्षण २०२२ अंतर्गत प्लास्टिक पिशव्यांचा वापर पुर्णपणे बंद करावा अनथ्या दंडात्मक कारवाई सुरुच राहील.
– महेंद्र संप्रे, सहाय्यक आयुक्त, ऐरोली विभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -