घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रआद्य स्वयंभू सप्तशृंगी देवी बद्दल हे माहिती आहे का ?

आद्य स्वयंभू सप्तशृंगी देवी बद्दल हे माहिती आहे का ?

Subscribe

सह्याद्री पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत डोंगरपठारावर समुद्रसपाटीपासून सुमारे १ हजार ४८० मीटर उंचीवर निसर्गसौंदर्य व भक्तिभावाने भारावलेला राज्यातील देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेला सप्तशृंगगड (वणी) हे देशातील शक्तिपीठांपैकी एक महत्त्वाचे ठिकाण मानले जाते. सात शिखरांचे (शृंगे) स्थान म्हणून यास ‘सप्तशृंगी’ हे नाव पडले आहे.
शुंभ-निशुंभ व महिषासूर या असूरांचा नाश केल्यानंतर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले होते.

पुराणकाळातील विविध धर्मग्रंथांत देवीचे वर्णन आढळते. श्री सप्तशृंगी देवीस महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप मानले जाते. सप्तशृंगी निवासिनी देवीपर्यंत सुमारे पाचशे पायर्‍यांची चढण आहे. पायर्‍या चढून गेल्यानंतर देवीची २.४३ मीटर उंचीची आदिशक्तीची भव्य मूर्ती खडकात असून, तिला ’अष्टभुजावाली देवी’ म्हणूनही संबोधतात; परंतु प्रत्यक्षात देवीला अठरा हात असून, हातांत शस्त्रास्त्रे आहेत. एक डावा हात डाव्या बाजूच्या कानावर टेकला आहे. दररोज देवीच्या माथ्यावर मुकुट ठेवून नाकात नथ, कर्णफुले, मंगळसूत्र, कमरपट्टा, तोडे, पावले परिधान केलेल्या श्री सप्तशृंगी देवीचे रूप खूपच मनमोहक दिसते. देवी सकाळी बाला, दुपारी तरुणी व सूर्यास्ताला वृद्धा भासते, अशी श्रद्धा आहे.

- Advertisement -

सप्तशृंगगडावर नवरात्रोत्सव, चैत्रोत्सव या दोन प्रमुख उत्साहांबरोबरच कावडयात्रा, शाकांबरी उत्सवही साजरे केले जातात. उत्सवासाठी देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहतात. उत्सव सोडूनही वर्षभर भाविकांबरोबरच पर्यटकांचाही राबता कायम असतो. सप्तशृंगी ट्रस्टची स्थापना २२ सप्टेंबर १९७५ मध्ये झाली. त्याच वेळी डोंगराच्या खोबणीत श्री भगवती मूर्तीसमोरील बाजूस २० बाय २० च्या पत्र्याची शेड, अशी परिस्थिती होती; पण विश्वस्त मंडळाने याबाबत दूरदृष्टीने विचार करून सुमारे सहा हजार चौरस फुटांचा सभामंडप तयार करून भाविकांना दर्शन व्यवस्थित व्हावे, याचे नियोजन केले आहे. तसेच गर्दीच्या वेळी एका बाजूने चढणीचा मार्ग असून, दर्शन घेतल्यानंतर दुसर्‍या बाजूने परतीच्या पायर्‍या तयार करण्यात आल्या आहेत. सर्व पायर्‍यांवर भाविकांना ऊन, वारा, पाऊस, तसेच मंदिर शिखरावरील दरडींपासून संरक्षण व्हावे यासाठी सिमेंट काँक्रीटचे भक्कम डोम तयार करण्यात आले आहेत. ट्रस्टने भाविकांसाठी निवासव्यवस्थेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी दोनशे खोल्या, एकाच वेळी हजारावर भाविक महाप्रसादाचा लाभ घेतील असे ’प्रसादालय’, धर्मार्थ दवाखाना, शिवालय तलावाचे सुशोभीकरण आदी प्रमुख कामे पूर्ण करून गडावर आलेल्या भाविकांचा सुरक्षिततेच्या दृष्टीने विमा काढलेला आहे. सप्तशृंगी ग्रामपंचायतीनेही गावातील अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण, भूमिगत गटारी, जलवाहिन्या आदींची कामे केली आहेत. त्याच बरोबर गडावर प्लॅस्टिकबंदी आहे.

महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन पीठे

हिंदू संस्कृतीमध्ये देवी हे शक्तीचे प्रतीक मानले जाते. असुरी शक्तींविरुद्ध दैवीशक्ती जेव्हा युद्ध करते तेव्हा त्याचे प्रतीक म्हणून नवरात्र साजरे केले जाते. भारतात महत्त्वाची अशी देवीची ५२ पीठे मान्यता पावलेली आहेत. देवीची ५२ पीठे म्हणजे ५२ तीर्थक्षेत्रे असून, प्रत्येक पीठ हे शक्तिपीठ म्हणून संबोधले जाते. ज्या केंद्रातून शक्ती प्रगट होते ते मूळ पीठ आहे. त्यांपैकी महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे मानली जातात. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, माहूरची रेणुका ही तीन प्रमुख शक्तिपीठे व सप्तशृंग गडावरची (वणीची) सप्तशृंगी देवी हे अर्ध शक्तिपीठ मानले जाते.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -