घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयात्रेच्या आठवणी : झिलेटीनची सोनेरी तुर्रेदार, रंगीबेरंगी पिसांची टोपीही यात्रेतून गायब

यात्रेच्या आठवणी : झिलेटीनची सोनेरी तुर्रेदार, रंगीबेरंगी पिसांची टोपीही यात्रेतून गायब

Subscribe

नाशिक : पूर्वी यात्रा म्हटली की, बच्चे कंपनीचा नूर बदलून जात. यात्राकरुन जेव्हा ही मंडळी घरी यायची तेव्हा त्यांना ओळखणेही मुश्किल होत. कारण त्यांचा ‘अवतार’ असा काही असायचा की, लांबून बघणार्‍यालाही लक्षात येईल की हा कार्टा यात्रेतून आला असेल. डोक्यावर वासुदेवाच्या टोपीच्या आकाराची रंगबेरंगी पिसांची टोपी, डोळ्यावर प्लास्टिकचा चष्मा, गळ्यात छोटी ढोलकी, फुंकल्यावर कागदाची नळी पुढे येणारी पिपाणी आणि हातात लाकडी चमकीदार तलवार.. या सार्‍या वस्तु मोरपिसासारख्या जपून ठेवल्या जात. रंगीबेरंगी पिसांच्या टोपीला सोनरी रंगाच्या कचकडी पेपरची मोर पिस लावलेली टोपी देखील पर्याय ठरत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुमारे सन २००० पर्यंत यात्रेची मजा काही औरच होती. निख्खळ मनोरंजन करणारी ही यात्रा गावोगावी भरायची आणि प्रत्येक ठिकाणी तिला भरभरुन प्रतिसाद मिळायचा. यात्रा जशी चित्तथरारत पाळणे आणि खाद्य पदार्थ, खेळण्यांसाठी प्रसिद्ध होती तशीच ती वैशिष्टपूर्ण वस्तूंसाठी देखील आठवणीत रहायची. लहान मुलांच्या बाबतीत विचार करायचा झाल्यास यात्रेत छोट्या व्यावसायिकांकडून अल्पदरात मिळणार्‍या आकर्षक खेळण्या आणि वस्तूंची ‘क्रेझ’ सुमारे चार पिढ्यांपर्यंत टिकून होती. या वस्तूंमध्ये फारसा बदलही होत नव्हता. विशेषत: दोन प्रकारच्या टोप्या यात्रेत मिळायच्या म्हणजे मिळायच्याच. लाल, पिवळा, हिरवा, जांभळा असे रंग असलेली पिसांची टोपी. यात पक्षांची पांढरे पिसे रंगवून ते कागदाला चिटकवले जायचे. वासुदेवाची जशी कोनेदार टोपी असते तसा आकारात ती मिळायची. टोपी डोक्यावरुन उडून जाऊ नये म्हणून त्याला रबर लावलेले असायचे. हे रबर कानामागून घेऊन हनवटीच्या खालच्या बाजुला रुतवले की कुणाचा बाप जरी आला तरी टोपी काढू शकत नव्हता. याच टोपीला पर्याय म्हणून सोनरी टोपी असायची. झिलेटीनच्या चमकीदार सोनरी टोपीला वर मस्तपैकी फेट्यासारखा तुर्रा काढला जायचा. बर्‍याचदा तुर्र्‍यावर मोरपीस लावले जायचे. ही टोपी हातात घेतली तरी हात सोनरी चमकीने भरुन जायचा.

- Advertisement -

याशिवाय लाकडी तलवार खेळण्यासाठी मिळायची. विशेषत: दूरदर्शनवर रामायण आणि महाभारत मालिका सुरु होती तेव्हा लाकडी तलवार आणि प्लास्टिकच्या गदेला कमालीची मागणी असायची. तलवारीच्या आकारातील लाकडी पट्टीला सोनेरी झिलेटीन पेपर लावला जात. यामुळे ही तलवार अगदी सोन्यासारखी दिसायची. काही महाभाग कंबरेंच्या पट्ट्यात किंवा करदोड्यात खोचून युद्धाला निघाल्यासारख्या अर्विभावात गल्लीभर फिरायचे. गल्लीत पोरांचे टोळके जमले की खोटे-खोटे युद्ध व्हायचे. तलवारी फिरवल्या जायच्या. गदेने एकमेकांवर हल्ले केले जात. पण तलवार फिरवताना कागद निसटणार नाही याची पुरती काळजी घेतली जात. गदा मारताना तिचे प्लास्टिक वाकणार नाही याची दक्षता घेतली जात. पण कालांतराने फॅशनेबल टोप्या बाजारात सहजपणे मिळायला लागल्या आणि तेव्हापासून पिसांची टोपी आणि झिलेटीनच्या सोनेरी टाप्या यात्रेतून गायब झाल्यात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -