घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रीय एकजूट

ओबीसी आरक्षणप्रश्नी राष्ट्रीय एकजूट

Subscribe

राष्ट्रीय वेबिनारमध्ये ठराव; भुजबळ, मुख्यमंत्री स्टॅलिन, तेजस्वी यादव यांची उपस्थिती

नाशिक : देशातील विविध ओबीसी संघटनांनी एकत्र येत आयोजित केलेल्या राष्ट्रीय ओबीसी वेबिनारला मंत्री छगन भुजबळ यांनी उपस्थिती लावली. देशातील ओबीसींच्या विविध प्रश्नांवर या वेबिनारमध्ये चर्चा झाली. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी आरक्षणाच्या संघर्षावर यावेळी चर्चा झाली. सर्वांनी एकत्र येत ओबीसी समाजासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.

दृकश्राव्य माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांच्यासह तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, बिहारचे विरोधीपक्षनेते यादव, आंध्रचे शिक्षणमंत्री डॉ. आदीमुलापू सुरेश, खा. डिरेक ओ’ब्रायन, खा. मनोज कुमार झा, खा. मुहम्मद बशीर, डीएमके पक्षाचे के. विरामन्नी, ज्येष्ठ विधिज्ञ आणि खा. पी. विल्सन यांसह देशभरातील ओबीसी नेते उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -