घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनगर-दौड महामार्गावर एकाच दिवशी तीन अपघात; दोन ठार

नगर-दौड महामार्गावर एकाच दिवशी तीन अपघात; दोन ठार

Subscribe

पोलीस हवालदाराचा अपघाती मृत्यू

श्रीगोंदा : नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी (दि.२९) रात्री तीन अपघात झाले. या अपघात दोनजण ठार झाले. मृतांमध्ये नगरमधील पोलीस हवालदाराचा समावेश आहे. काष्टी जवळ झालेल्या अपघातात नगर येथील पोलीस हवालदार बाबासाहेब सुर्यभान करांडे (वय 41, रा. दरेवाडी, ता. नगर) तर मढेवडगाव शिवारात झालेल्या अपघातात भाऊसाहेब नामदेव परभणे (वय 43, रा. वडगाव रासाई, ता शिरुर) यांचा मृत्यू झाला. तर पांढरेवाडी शिवारातही एक अपघात झाला.
पहिल्या घटनेनुसार, पिकअप कडीपत्ता घेऊन काष्टीकडे जात होती. मढेवडगाव शिवारातील धावणे मलिकच्या वळणावर पिकअपचा टायर फुटला. त्यामुळे पिकअपने ट्रकला धडक दिली. या अपघातात भाऊसाहेब नामदेव परभणे हे ठार झाले. ही घटना शनिवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली.

दुसर्‍या घटनेनुसार, काष्टी शिवारातील शिवशक्ती डेअरीसमोर उसाच्या उभ्या टेलरला बाबासाहेब करांडे कार धडकली. या अपघातात करांडे ठार झाले. करांडे हे केंद्रिय रेल्वे पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल म्हणून दौड रेल्वेस्थानकमधील पोलिस स्टेशन कार्यरत होते. रविवारी (दि.३०) सकाळी दौडला कामावर जात असताना त्यांची कार ऊसाच्या टेलरला पाठीमागून धडकली. त्यात ते जागीच ठार झाले.

- Advertisement -

तिसर्‍या घटनेनुसार, पांढरेवाडी शिवारात रविवारी (दि.३०) पहाटे एका कारचा किरकोळ अपघात झाला. यामध्ये काहीजण जखमी झाले. याप्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. नगर-दौंड महामार्गावर तीन अपघात झाल्याने वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे वाहनचालक व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा. पोलिसांनी वाहतूक सुरळीत केल्याने वाहतूक सुरळीत झाली.

नगर-दौड रोड मृत्यूचा सापळा; १०० बळी

नगर-दौड राष्ट्रीय महामार्गावर दुभाजक नाहीत. कोठेही रिफ्लेकटर नाहीत. त्यामुळे दररोज या मार्गावर अपघात होतात. यामध्ये दुचाकी व कारचे सर्वाधिक अपघात आहेत. वर्षभरात 100 किमी अंतरावर 100 जणांचे बळी गेले असून, अनेक जखमी झाले आहेत.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -