घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्रीगोंदा तालुक्यातील चिखली-टाकळी काझी सबस्टेशनची कामे होणार सुरु

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली-टाकळी काझी सबस्टेशनची कामे होणार सुरु

Subscribe

काष्टी नळपाणी पुरवठा योजनेला सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध

श्रीगोंदा : तालुक्यातील चिखली व नगर तालुक्यातील टाकळी काझी या दोन वीज सबस्टेशनला मंजुरी मिळाली आहे. निधीची तरतूद झाली असल्याने लवकरच कामे सुरू होणार आहेत, अशी माहिती आमदार बबन पाचपुते यांनी दिली. तसेच काष्टी नळपाणी पुरवठा योजनेला सुमारे साडे पाच कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.

श्रीगोंदा तालुक्यातील चिखली परिसरात वीजेच्या अडचणी निर्माण होत होत्या म्हणून या परिसरातील गावांच्या वीजेच्या प्रश्न सोडविण्यासाठी या भागात सबस्टेशन होणे आवश्यक होते म्हणून आपण शासन दरबारी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या कडे पाठपुरावा केला असुन चिखली व नगर तालुक्यातील टाकळी काझी या दोन वीज उपकेंद्राना निधीची तरतूद झाली आहे. लवकरच कामे सुरू होणार असल्याचे आ. बबनराव पाचपुते यांनी सांगितले आहे.तसेच घारगाव,घोटवी व हिरडगाव वीज उपकेंद्रासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला आहे तसेच लोणी व्यंकनाथ येथील वीज उपकेंद्राची क्षमता वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे ही आ. पाचपुते यांनी सांगितले.

- Advertisement -

काष्टी नळपाणी योजनेसाठी अतिरिक्त साडेपाच कोटींचा निधी मंजूर

काष्टी नळपाणी योजनेतील गवतेवस्ती येथे पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेसाठी सुमारे ५कोटी६१लाख रुपयांचा अतिरिक्त निधी उपलब्ध झाला आहे अशी माहिती आमदार बबन पाचपुते यांनी दिली. काष्टी गावासाठी घोड धरणावरुन नळपाणी योजना आणली आहे पण या योजनेतून काही वाड्या वस्त्यांना पाणी जाण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या त्यामुळे शासन दरबारी पाठपुरावा करून गवतेवस्ती येथे पाण्याची टाकी व पाणी वितरण व्यवस्थेसाठी अतिरिक्त निधी उपलब्ध झाला असल्यामुळे पाणी योजनेतील अडथळे दूर झाले असल्याने लवकरच सर्व पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, असे आमदार बबन पाचपुते यांनी सांगितले.

माझ्या तब्येतीची काळजी विरोधकांनी करु नये 

माझी तब्बेत ठणठणीत असुन तालुक्यातील व मतदारसंघाच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे माझ्या तब्येतीची काळजी करण्यासाठी माझी जनता सक्षम आहे विरोधकांनी माझ्या तब्येतीची काळजी करू नये असे असा सल्लाही आमदार पाचपुते यांनी विरोधकांना दिला आहे. – बबन पाचपुते, आमदार

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -