घरमतप्रवाहभाग २९ - साहेबांची बारामती!

भाग २९ – साहेबांची बारामती!

Subscribe

देशभरात आणि विशेषतः महाराष्ट्रात “बारामती पटर्न” बद्दल एक विशेष आकर्षण आहे. या शहराबद्दल आणि त्या शहराच्या झालेल्या एकूणच विकासाबद्दल जाणून घ्यायला अनेकांची उत्सुकता असते.

बारामती पॅटर्न हा विकासाचा पॅटर्न म्हणून देशभर प्रसिद्ध पावला.पण त्याला ही ओळख मिळवून देण्यासाठी पवार साहेब आणि कुटुंबाचा प्रचंड मोठा वाटा आहे.साहेबांच्या म्हणण्यानुसार, “आपल्या मतदारसंघात कालसुसंगत मूलभूत विकासासाठी राजकारविरहीत दृष्टीने लक्ष घातलं तर आपल्याला आमूलाग्र बदल घडवून आणता येतो..!

- Advertisement -

बारामतीच्या पटलावर साहेबांचा उदय 1962 पासून झाला.आणि सुरवातीपासूनच पवार साहेबांनी मतदारसंघातील कोणत्याही प्रश्नांवर किंवा समस्येवर उत्तर शोधताना संबंधित प्रश्नांच किंवा समस्येचं पुर्णतः निराकरण होईल याच पद्धतीने शोधलं.थोडक्यात एखाद्या प्रश्नांच त्यांनी तात्पुरत्या स्वरूपाच समाधान होईल अस कधीच केलं नाही.

बारामतीला विकासाच्या वाटेवर नेत असताना पवार साहेबांनी चहू बाजूंनी विचार केला आहे.या विकासामध्ये शेती कशी समृद्ध करता येईल?रोजगाराची उपलब्धतात कशी होईल? परिसरातील उद्योगधंद्यांना खतपाणी कसे मिळेल?येथील विदयार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण कसं मिळेल? या अश्या अनेक बाबींचा साहेबांनी अतिशय खोलात जाऊन विचार तर केलाच पण त्या दृष्टीने अतिशय जबाबदारीने काम देखील केले.

- Advertisement -

परिणामी आज बारामतीत समृद्ध शेती आहे,फाईव्ह स्टार MIDC असल्याने आज हजारो तरुणांना रोजगार मिळालाय,शेकडो लोकप्रिय उत्पादकांनी आज बारामतीत आपले प्लांट लावले आहेत,अनेक जागतिक दर्जाचं शिक्षण देणाऱ्या संस्था आज बारामतीत कार्यरत आहेत.

आज बारामतीत,”बारामती कृषिविकास संस्था,बारामती”, ही जगभर प्रसिद्ध पावलेली संस्था आहे. याद्वारे जलसंधारण आणि मृदुसंधारण यासोबतच शेतीच्या तंत्रज्ञानाचा इथं अभ्यास केला जातो.बारामतीला पाऊसाच प्रमाण कमी आहे.हे लक्षात घेऊन इथल्या शेतकऱ्यांना डाळिंब आणि द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी प्रेरित करण्यात आलं. त्याचे अतिशय सकरात्मक परिणाम समोर आले.

बारामतीचा दुग्धव्यवसाय देखील जागतिक दर्जाचं आहे अस म्हटल्यास वावग ठरणार नाही. जगप्रसिद्ध “श्रायबर डायनॅमिक्स डेअरीज लिमिटेड”, चा प्लांट आज बारामतीत आहे. सुप्रसिद्ध ब्रिटनिया या कंपनीसाठी लागणार चीजची निर्मिती आज इथेच होते. तुम्हाला ट्रॉपिकाना हे दर्जेदार नैसर्गिक फळांच्या रसाच उत्पादन करणारी कंपनी माहिती असेल.या कंपनीच्या संपूर्ण रसाच उत्पादन आज बारामतीत होत. PIAGGIO ही ऑटोमोबाईल क्षेत्रातील जागतिक कंपनी देखील बारामतीत आहे.

बारामतीच्या विकासाच नियोजन करताना पुढील 50 वर्षांचा विचार केला गेलाय.या शहराचा सर्वांगीण विकास करता असताना सांस्कृतिक,साहित्यिक,शैक्षणिक आणि इतर सर्वच बाबींचा विचार केला गेलाय.

बारामती पॅटर्नचा विचार करत असताना एक गोष्ट लक्षात येत की बारामती पॅटर्न म्हणजे,प्रतिकूल परिस्थितीत उभं राहण..! फक्त आठ इंच सरासरी पाऊस पडणाऱ्या या दुष्काळी भागात आज पवार साहेब आणि कुटुंबीयांनी आज अक्षरशः नंदनवन उभं केलं आहे.आज इथं 12 साखर कारखाने आहेत,इथली द्राक्षे परदेशी बाजारपेठात जातात,इथे तयार होणारा फळांचा रस देशाच्या कानाकोपऱ्यात जातो,पिझ्झा हट, मॅकडोनाल्ड सारख्या कंपन्यांना लागणार चीज आज इथुंनच पुरवला जाते..!

राजकारणाच्या पलीकडे जाऊन विकासाचा शाश्वत विचार हेच बारामती पॅटर्नच्या यशाचं रहस्य आहे..!

#साहेब_माझा विठ्ठल

Jitendra Awhad
Jitendra Awhadhttps://www.mymahanagar.com/author/jitendra-awhad/
डॉ. जितेंद्र आव्हाड हे राज्याचे माजी गृहनिर्माण मंत्री असून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील प्रमुख नेते आहेत. डॉक्टरेट मिळवलेले आव्हाड विविध विषयांवर लेखन करत असतात. त्या लेखांचा समावेश इथे केलेला आहे. लेखामधील मते ही डॉ. जितेंद्र आव्हाड यांची वैयक्तिक मते आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -