घरपालघरमिक्सर ट्रकची दुचाकीला धडक,दोघांचा जागीच मृत्यू

मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक,दोघांचा जागीच मृत्यू

Subscribe

दुचाकीस्वार दोघेजण दुचाकीवरून दूरवर फेकले गेले आणि भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकदेखील रस्त्यावरून खाली उतरत लगतच्या शेतात पलटी झाला.

वसई: पालघरमध्ये भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने वरई- सफाळे मार्गावर भीषण असा अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार असलेल्या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. पालघर तालुक्यातील सफाळे पूर्वेकडे असलेल्या वरई-सफाळे या मार्गावर सिमेंट मिक्सर ट्रक वरईहून सफाळ्याच्या दिशेने जात होता तसेच दुचाकीस्वार असलेले दोघे वरईच्या दिशेने जात होते. याचवेळी, भरधव सिमेंट मिक्सर ट्रकने विरुद्ध दिशेने येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. वरई-सफाळे मार्गावर पारगाव-गिराळे गावादरम्यान डोंगरपाडा इथे असलेल्या वळणावर हा भीषण अपघात घडला आहे. अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वार दोघेजण दुचाकीवरून दूरवर फेकले गेले आणि भरधाव सिमेंट मिक्सर ट्रकदेखील रस्त्यावरून खाली उतरत लगतच्या शेतात पलटी झाला.

या भीषण अपघातात दुचाकीस्वार दोघे गंभीररित्या जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव सिमेंट मिक्सर ट्रक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण असा अपघात घडला. अपघातातील मृत दोघेही दुचाकीस्वार विरार परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. या अपघाताची माहिती मिळताच सफाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले .त्यांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सफाळे पोलीस करीत आहेत.या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -