घरपालघरसमुद्र किनार्‍याची स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित यंत्र

समुद्र किनार्‍याची स्वच्छता राखण्यासाठी स्वयंचलित यंत्र

Subscribe

त्यात मुंबई २, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई महापालिका व पालघर आणि मीरा- भाईंदर पालिकेस देण्यात आले आहेत.

भाईंदर : मीरा -भाईंदरमधील समुद्र किनार्‍याची (बीच ) स्वच्छता व प्रदूषण राखण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हाधिकारी ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वयंचलित यंत्र मीरा- भाईंदर महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्याकडे देण्यात आले आहे. त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे. हे यंत्र येत्या काही दिवसांतच काम करताना दिसणार आहे. तर सदरील स्वयंचलित यंत्राचा एका वर्षाच्या स्वच्छतेचा खर्च राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ विभाग उचलणार आहे. अशी 10 यंत्रे महाराष्ट्र राज्यात देण्यात आली आहेत. त्यात मुंबई २, रायगड, रत्नागिरी, नवी मुंबई महापालिका व पालघर आणि मीरा- भाईंदर पालिकेस देण्यात आले आहेत.

समुद्र किनार्‍याची स्वच्छता करणार्‍या प्रत्येकी सुमारे ८० लाख रुपयांच्या यंत्रसामुग्री खरेदीला मंजुरी दिली होती. ’बीच क्लिनिंग मशीन’ नावाचे हे यंत्र जिल्हाधिकारी कार्यालयात सदरील यंत्र हे हस्तांतरित करण्यात आले आहेत. या यंत्रांच्या वितरणासाठी पालिका अधिकारी उपायुक्त रवी पवार यांची नेमणूक करण्यात आली आहे. सदरील स्वयंचलित किनारा स्वच्छता यंत्राला रॉक बकेट, ग्रॅब्लर बकेट तसेच सॅण्ड क्लिनर अशा वेगवेगळ्या संलग्नकांसोबत सोबत देण्यात आले आहे. या यंत्राचे प्रात्यक्षिक पालिका अधिकार्‍यांनी उत्तन समुद्र किनारी पाहिले आहे. या स्वयंचलित यंत्रामुळे किनार्‍यावर होणारी अस्वच्छता, कचरा दूर होण्यास मदत होणार आहे. यामुळे जलद गतीने सफाई होऊन मनुष्यबळाची बचत होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

हे यंत्र पहिल्या वर्षी प्रदूषण नियंत्रण मंडळाने नेमून दिलेल्या ठेकेदारामार्फत चालवण्यात येणार असून देखभाल दुरुस्तीची दोन वर्षे हमी असणारे हे यंत्र या कालावधीत कार्यरत ठेवण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी कार्यालयावर सोपवण्यात आली आहे. तर ह्यात सदरील स्वच्छता यंत्र हे कंत्राटदार चालवणार असून त्यात त्यात ड्रायव्हर व डिझेल असे एक वर्ष ठेकेदार पुरवठा करणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -