Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर पालघर तीन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा

तीन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हा

Subscribe

विरारमध्येच बोगस वैद्यकीय पदवी वापरून वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या असगर नकुमुदिन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वसईः वसई -विरार महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहिम हाती घेतली असून तीन बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील दोन डॉक्टरांकडे बोगस डिग्री आढळून आली. तर एक महिला आपल्या मयत बहिणीच्या क्लिनिकमध्ये डॉक्टर म्हणून पेशंटवर उपचार करत असल्याचे उजेडात आले आहे.विरार पश्चिमेकडील वाय के नगरमध्ये भानू चंपकलाल शाह या महिला डॉक्टरची वैद्यकीय पदवी तपासला असता त्या महिलेने गुजरातमधील नॅचरोपॅथीचे प्रमाणपत्र दाखवले. त्यामुळे तिच्याविरोधात अर्नाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विरारमध्येच बोगस वैद्यकीय पदवी वापरून वैद्यकीय व्यवसाय करत असलेल्या असगर नकुमुदिन शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेचरोपॅथी डॉक्टर असल्याची बतावणी करणारा शेख अ‍ॅलोपॅथी उपचार करत असल्याचे समजल्यावर महापालिकेच्या पथकाने वैद्यकीय प्रमाणपत्राची तपासणी केली असता ते बोगस असल्याचे आढळून आले. तर वसई पूर्वेला आपल्या मृत बहिणीचा दवाखाना स्वतः डॉक्टर असल्याची बतावणी करून चालवत असलेल्या सरजून गैयासुद्दीन या महिलेविरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. संजिता परवीन यांचे निधन झाल्यानंतर त्यांची बहिण सरजून गैयासुद्दीन त्या दवाखानात रुग्णांवर उपचार करत होती. महापालिकेच्या पथकाने तपासणी केली तेव्हा तिच्याकडे कोणतेही वैद्यकीय प्रमाणपत्र आढळून आले नाही. ती बीएचएमएमच्या तिसर्‍या वर्षाची विद्यार्थीनी असल्याचेही उजेडात आले आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -