घरपालघरजव्हार तालुक्यात कुपोषणाचे आव्हान; अंगणवाडी रिक्त जागांमुळे वाढतोय कामाचा ताण

जव्हार तालुक्यात कुपोषणाचे आव्हान; अंगणवाडी रिक्त जागांमुळे वाढतोय कामाचा ताण

Subscribe

जव्हार तालुक्यात लहान बालकांपासून गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते आवश्यक संतुलित व समतोल आहार यांचे सुयोग्य नियोजन करून तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

जव्हार तालुक्यात लहान बालकांपासून गरोदर महिला व स्तनदा मातांच्या आरोग्याची काळजी घेण्यापासून ते आवश्यक संतुलित व समतोल आहार यांचे सुयोग्य नियोजन करून तालुक्यातील कुपोषणाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु सद्यस्थितीत अंगणवाडी सेविकांच्या ३, मदतनिसांच्या ६ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २ जागा रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांचे मानधन नियमित वेळेवर होत नाही. सतत मानधन देण्याच्या तारखा मागेपुढे होतात. यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनिसांची गैरसोय होत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काही अंगणवाडी सेविकांचे मानधन रखडले आहे. त्यांना उधारीवर कुटुंबाचा गाडा चालवावा लागत आहे. यावर महिला व बालकल्याण प्रकल्प अधिकारी वेळेवर व नियमित तारखांवर मानधन मिळावे म्हणून उपाय योजना करत नसल्याचे देखील आरोप होत आहेत.

अंगणवाडी सेविका, मतदनीस, मिनी अंगणवाडी सेविका यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. महत्त्वाचे म्हणजे मानधन वेळेवर मिळणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविकांना अनेक कामे दिली जात आहेत. शून्य ते सहा वयोगटातील मुला-मुलींच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागते. गावातल्या गरोदर मातांची माहितीही संकलित करावी लागते. मात्र, कामाच्या तुलनेत मानधन कमी आहे. त्यात वाढ करण्याची गरज आहे. शिवाय ज्या अंगणवाडी केंद्रात रिक्त जागा आहेत. अशा ठिकाणी त्या जागा भरल्यास अतिरिक्त असणारा ताण कमी होऊन अजून चांगल्या प्रकारे सेवा करता येईल.

- Advertisement -

जव्हार तालुक्यात दोन प्रकल्प आहेत. प्रकल्प १ मध्ये १५३ केंद्र जव्हार २ प्रकल्प १९१ केंद्र एकूण तालुक्यात ३५४ अंगणवाडी आहेत. सर्व ठिकाणी अमृत आहार अंगणवाडीतच देणे सुरु आहे. यामध्ये गरोदर माता १४८७, स्तनदा माता १४७४, लहान बालके (३ वर्षापर्यंत) ६६३६ तर मोठी (३ ते ६ वर्षाची) बालके ७८०३ अशी संख्या आहे.

मानधन कमी असल्याची ओरड अंगणवाडी सेविका, मदतनिसांची आहे. तसेच तारखेच्या तारखेला मानधन मिळत नाही. दोन महिन्यांचे वेतन एकदाच मिळते.
– अंगणवाडी सेविका

- Advertisement -

अंगणवाडीतील मुलांना अक्षरांची ओळख करून देण्याबरोबरच त्यांना खाऊचे वाटप करावे लागते. आरोग्याबाबतही मुलांची काळजी घ्यावी लागते.
– मदतनीस

जव्हार तालुक्यात अंगणवाडी प्रकल्प अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. रिक्त जागा भरण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा केली आहे. मानधन नियमितपणे मिळावे. यासाठी दोन्ही प्रकल्पाला सूचना केल्या आहेत. शिवाय जिल्हा स्तरावर देखील ही बाब निदर्शनास आणली आहे.
– सुरेश कोरडा, सभापती, पंचायत समिती, जव्हार

हेही वाचा –

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला ड्रग्स प्रकरणातून दिलासा; एनसीबीने दिली क्लीनचिट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -