घरमहाराष्ट्रशब्द मोडल्याचा आरोप करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?, चंद्रकांत पाटील...

शब्द मोडल्याचा आरोप करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?, चंद्रकांत पाटील यांचा प्रश्न

Subscribe

संभाजी राजे छत्रपती (Sambhaji Raje) यांनी राज्यसभा निवडणुकीतून माघार घेतली. त्यानंतर राजकीय प्रतिक्रीया येऊ लागल्या आहेत. यात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शब्द मोडल्याचा आरोप करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल?, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विचारला आहे.

फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते –

- Advertisement -

राज्यसभा उमेदवारीबाबत उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) शब्द मोडला. शिवसेनेत प्रवेशाचा प्रस्ताव स्वीकारता येणार नाही, हे स्पष्ट केल्याचे छ. संभाजीराजे सांगताहेत. शब्द मोडल्याचा आरोप ठेवून करून युती तोडणारे उद्धवजी आता काय बोलाल? संभाजीराजेही (Sambhaji Raje) खोटे बोलताहेत? त्यांचा फोनही न घेणे कुठल्या सभ्यतेत बसते?, असा प्रश्न त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विट करून विचारला आहे.

- Advertisement -

शोधा एखादे तथाकथित सेक्युलर नाव –

शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जाऊन खरं-खोटं करण्याचं संभाजीराजेंचे (Uddhav Thackeray) आव्हान उद्धव ठाकरले यांनी स्वीकारावे. मग कुणी खंजीर खुपसला, हे जनतेला समजेल तरी. महाराजांच्या वंशजांचा मान ठेवायचा नाही, तर पक्षाच्या नावात ‘शिव’ वापरायचा नैतिक अधिकारही नाही! शोधा एखादे तथाकथित सेक्युलर नाव…, अशे दुसरे ट्विटकरून त्यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.

संभाजी राजे यांची निवडणुकीतून माघार –

राज्यसभा निवडणूक लढवणार नाही, असे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी मी हा निर्णय घेतला असल्याचे संभारीज राजे यांनी म्हटले आहे. मी राज्यसभा निवडणूक लढवत नसलो, तरी ही माघार नाही, हा माझा स्वाभिमान आहे. कुणापुढे झुकून मला राज्यसभेची खासदारकी नको आहे, असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द मोडला-

मला इतकं वाईट वाटतंय. मुख्यमंत्र्यांकडून ही अपेक्षा नव्हती की त्यांनी दिलेला शब्द मोडला. ‘स्वराज्य’ बांधण्यासाठी मी सज्ज झालो आहे. मावळ्यांना संघटित करण्यासाठी मी मोकळा झालो आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणूक हरल्यानंतर मी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. लोकांनी प्रेम दिलं. लोकांची इच्छा होती की सगळ्यांना संघटित करा. मला आज मिळालेली ही संधी आहे. माझी स्पर्धा माझ्याबरोबर आहे. म्हणून या विस्थापित मावळ्यांना संघटित करण्यासाठी, गोरगरीबांना न्याय देण्यासाठी मी ‘स्वराज्य’च्या माध्यमातून उभा राहणार आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -