घरपालघरशहरातील सलून, स्पा, जिम पुन्हा बंद

शहरातील सलून, स्पा, जिम पुन्हा बंद

Subscribe

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी काढलेल्या आदेशाला २४ तास ही उलटले नसताना घुमजाव करत नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रक आदेशात जिल्ह्यातील सर्व सलून, स्पा व जिमला पूर्णपणे पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी काढलेल्या आदेशाला २४ तास ही उलटले नसताना घुमजाव करत नव्याने काढलेल्या शुद्धीपत्रक आदेशात जिल्ह्यातील सर्व सलून, स्पा व जिमला पूर्णपणे पुन्हा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे सलून, स्पा व जिम मालकांमध्ये जिल्हा प्रशासनाविरुद्ध तीव्र नाराजी पहायला मिळत आहे. ५ एप्रिल ते ३१ मे पर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सलून, स्पा व जिम मालकांची आर्थिकदृष्ट्या कंबरमोड झाली असताना शासनाने आमच्यावर अन्याय केला आहे. मागील वर्षीच्या लॉकडाऊनमध्ये ही सर्वात जास्त फटका सलून, स्पा व जिमवाल्यांना बसला होता. जवळपास ४ महिने त्यांना आपला व्यवसाय बंद ठेवावा लागला होता. त्यामुळे परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. शासनाने आपला निर्णय परत घेऊन आम्हाला ही दोन पैशे कमवायची संधी द्यावी, ज्यांनी आम्ही आमच्या परिवारांचे उदरनिर्वाह करू शकतील, असा एका सलून वाल्यानी दैनिक आपलं महानगरशी आपले दुख व्यक्त केले.

पालघर शहरात जवळपास १० जिम आहेत. जिम मालकाला दर महिने मोठी रक्कम भाडे स्वरूपात द्यावे लागत आहे. तसेच प्रत्येक जिममध्ये ५ ते ७ लोकांचा कोच, ट्रेनर व स्पोर्ट स्टाफ असतो. या सर्वांचा रोजगार जिम बंद असल्याने बुडाले आहे. शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून जिमला परवानगी द्यावी. जेणेकरून त्यांची अडचण दूर होईल.
– गौरव शुक्ला, जिम मालक

- Advertisement -

पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनीही पालघर शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण विभागात व्यापाऱ्यांना सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेपर्यंत आपले आस्थापने उघडण्याची परवानगी दिली होती. ज्यात लाँड्री (कपडे इस्त्री करणे), सलून (केश कर्तनालय व दाढी करणे), स्टेशनरी, झेरॉक्स, फुटवेअर, इलेक्ट्रिकल व हार्डवेअर, कटलरी, इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल, फोटो स्टुडिओ व शिलाई दुकानांचे समावेश आहेत. त्यामुळे शहरातील या आस्थापना धारकांनी सुटकेचा श्वास घेत मंगळवारी १ जून रोजी आपली आस्थापने, व्यापार सुरु केले होते. ज्यात सलून (केश कर्तनालय व दाढी करणे), स्पा व जिमचा ही समावेश होता. पण, दुसऱ्याच दिवशी जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढून सलून, स्पा, जिम यांना बंदी घातली आहे.

आम्हाला पण घर आहे, कुटुंब आहे, हातावर पोट आहे. सर्वांना परवानगी दिली गेली आहे. तर आम्हाला का नाही? पालघर शहरात जवळपास १०० सलूनच्या दुकाने आहेत. त्यातली ९० टक्के दुकाने भाडे तत्वावर आहेत. बंद दुकानाचे भाडे ही आम्हाला द्यावे लागत आहे. शासनाकडून आजपर्यंत एक रुपयांची मदत सलूनवाल्यांना देण्यात आली नाही. शासनाने घेतलेला निर्णय मागे घेऊन सलूनवाल्यांना ही दुकाने उघडायची परवानगी द्यावी. मागच्या वर्षीप्रमाणे यंदा ही कोरोनापासून सुरक्षेसाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या दिशानिर्देशचे पालन करू.
– मनोज महाले, अध्यक्ष, पालघर शहर सलून असोसिएशन

- Advertisement -

हेही वाचा – 

बियाणे, खतांच्या विक्रीत काळाबाजार; खासदार, आमदार आक्रमक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -