घरपालघरपालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्र यावे - पालकमंत्री दादा भुसे

पालघर जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी एकत्र यावे – पालकमंत्री दादा भुसे

Subscribe

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही कार्यालयांना जागाही उपलब्ध झाल्या आहेत.

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांना जागा उपलब्ध करून देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याने जिल्ह्यातील काही कार्यालयांना जागाही उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांनी एकत्रित येऊन काम केल्यास जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधला जाईल, असा विश्वास कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केला. जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी पालकमंत्री दादा भुसे बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण, आमदार सुनील भुसारा, श्रीनिवास वनगा, राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आदी उपस्थित होते.

विक्रमगड येथील दोन हेक्टर शासकीय जमीन जलसंपदा विभागाला उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच तलासरी येथील नगरपंचायतीसाठी सुद्धा शासकीय जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे वाडा तालुक्यातील शासकीय कार्यालयासाठी जागेची उपलब्धता लवकरच करण्यात येईल, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी सांगितले. खरीप हंगामामध्ये शेतकरी बांधवांना बियाणांची कमतरता जाणवणार नाही. यासाठी कृषी विभागाने आत्तापासूनच बियाणांची उपलब्धता करून ठेवावी, अशी सूचना भुसे यांनी कृषी विभागाला दिली. माहीम-केळवे धरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व जलाशयाची सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या सर्व कामांना जिल्हा नियोजन समितीमधून निधी पुरवला जाणार असल्याचे पालकमंत्री भुसे यांनी सांगितले.

- Advertisement -

हेही वाचा –

कोरोना संसर्ग वाढत असलेल्या राज्यांत चाचण्यांचा वेग वाढवा, केंद्राचे राज्यांना निर्देश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -