घरपालघरव्यावसायिक सिलिंडरची २५ टक्क्यांने दरवाढ; जेवण, नाश्ता महागणार

व्यावसायिक सिलिंडरची २५ टक्क्यांने दरवाढ; जेवण, नाश्ता महागणार

Subscribe

शहरातील शेकडो हॉटेल व छोटे गाडीवरचे व्यावसायिक गॅसच्या मदतीने व्यवसाय करत आहेत. परंतु फेब्रुवारीपासून आता मेपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

शहरातील शेकडो हॉटेल व छोटे गाडीवरचे व्यावसायिक गॅसच्या मदतीने व्यवसाय करत आहेत. परंतु फेब्रुवारीपासून आता मेपर्यंत व्यावसायिक सिलिंडरच्या दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तेल, बेसन यांच्या दरवाढीमुळे आधीच व्यावसायिक त्रासले असून आता गॅसचे दरही आवाक्याबाहेर गेले आहेत. त्यामुळे जेवण व नाश्ता महागणार असून पदार्थांच्या किंमती वाढणार असल्याने ग्राहकांची संख्याही कमी होईल की काय, अशी भीती व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. सध्या घरगुती गॅस सिलिंडरसोबतच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यात व्यावसायिक सिलिंडरचे भाव २ हजार ६६ रुपये होते. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात सिलिंडरचे भाव जवळपास १०० रुपयांनी कमी झाले. पुढे मार्च महिन्यात पुन्हा १०० रुपयांची वाढ झाली. तर एप्रिल महिन्यात हेच सिलिंडर २ हजार ३३२ रुपयाला मिळू लागले. तर मे महिन्यात सिलिंडरची किंमत २ हजार ४२६ झाली आहे.

दररोज कोणत्या ना कोणत्या साहित्याचे भाव वाढत आहेत. त्यामुळे जेवणाचे भाव वारंवार वाढवणे शक्य नाही. वारंवार दरवाढ केल्यास याचा परिणाम ग्राहकावर नक्कीच होऊ शकतो. स्पर्धा तयार होऊन भावात वरचढ होण्याची शक्यता आहे.
– रवी, खानावळ चालक, जव्हार

- Advertisement -

तालुक्यातील सगळीच प्रशासकीय कार्यालये जव्हार शहरात असल्याने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांना चहा, नाश्ता व जेवण करणे सुखकर होत होते. परंतु आता हे पदार्थ घेणे कठीण होत चालले आहे. आधीच पेट्रोल, डिझेल महागले असून आता सिलिंडरच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे जीवन जगायचे कसे, असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडला आहे.

मागील चार महिन्यांत व्यावसायिक सिलिंडरचे भाव २५ टक्क्यांनी महागले आहेत. या दरवाढीमुळे हॉटेलमध्ये बनणाऱ्या भाजी, पोळी, सर्व प्रकारचे नाश्ता यांचे दर हॉटेल चालकांना वाढवण्याशिवाय पर्याय नाही.
–  पिंट्या झोले, हॉटेल व्यावसायिक, जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -