घरपालघरबांधकाम विभागात कंत्राटदारांचे देयकांसाठी बस्तान

बांधकाम विभागात कंत्राटदारांचे देयकांसाठी बस्तान

Subscribe

शुक्रवारी (दि. ३१) आर्थिक वर्षाची सांगता झाली.परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यकारी अभियंता हे या महत्वाच्या दिवसांत कार्यालयात हजर नसल्याने ठेकेदारांची एकच तारांबळ उडाली.

जव्हार : मार्च एण्डिंगच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात सुट्टीच्या दिवशीही कंत्राटदाराची देयकांसाठी धावपळ सुरू होती. त्यामुळे या कार्यालयाच्या परिसरात अलिशान वाहनांची वर्दळ गेल्या काही दिवसांपासून वाढली होती. ठेकेदारही आपल्या कामांची बिले काढण्यासाठी तळ ठोकून होते. तर मार्च एण्डिंगमुळे कामकाज सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. शुक्रवारी (दि. ३१) आर्थिक वर्षाची सांगता झाली.परंतु तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे विभागीय कार्यकारी अभियंता हे या महत्वाच्या दिवसांत कार्यालयात हजर नसल्याने ठेकेदारांची एकच तारांबळ उडाली.

गुरुवारी रामनवमीची सुट्टी असतानाही सर्वच शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची धावपळ सुरू होती. कामांची बिले काढण्यासाठी ठेकेदार ठाण मांडूनच बसल्याचे चित्र दिसून येत होते. त्यामुळे सुट्टीचा दिवस असला तरी सकाळपासूनच नागरिकांनी गर्दी केली होती. या विभागात कामांची बिले तपासणे, अनुदान वर्ग करणे, कामांची बिले काढणे, अखर्चित निधी प्राधान्याने खर्च करणे, शासनाकडून आलेले अनुदान वर्ग करणे शासनाकडून आलेले अनुदान कोषागार कार्यालयातून काढून घेणे अशी कामे सुरू होती.
सुट्टीच्या दिवशीही सर्वच कार्यालयांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होते. कोट्यवधी रुपयांचा आलेला निधी विविध कामासाठी खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेतील कार्यकारी अभियंता वगळता इतर अधिकारी, कर्मचारी व ठेकेदारांची धावपळ सुरू होती. १०० टक्के निधी खर्च करण्यासाठी आणि जास्तीत जास्त फायली हाताळताना कर्मचार्‍यांची चांगलीच धावपळ सुरू होती. त्यामुळे मार्च एंण्डिंगची लगीनघाई विविध विभागात सुरू असल्याची पहायला मिळाले.

- Advertisement -

सलग चार दिवस कार्यकारी अभियंता यांचा फोन बंद येत आहे.शिवाय याबाबत कार्यालयातही कुणाला कल्पना नाही. ठेकेदारांचे काम व्हावे यासाठी लेखा विभागाला सूचना देवून मार्च सांभाळण्याचा प्रयत्न कसोशीने केला आहे. सुनील भुसारा,
आमदार, विक्रमगड विधानसभा

गेल्या चार दिवसांपासून आलेल्या ठेकेदारांचे देयके देण्यासाठी या कार्यालयाने तजवीज केली होती.सर्व कामे आटोपली आहेत.
राकेश रंजन,
लेखा अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालय,ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -