घरपालघरभाडेकरूंची माहिती न देणार्‍यांवर कारवाईची मागणी

भाडेकरूंची माहिती न देणार्‍यांवर कारवाईची मागणी

Subscribe

पोलिस ठाण्यात भाडेकरूबाबत अत्यावश्यक माहिती व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत ईमेल किंवा टपालाद्वारे देणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम १८८ प्रमाणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

भाईंदर :- मीरा-भाईंदर व वसई विरार पोलीस आयुक्तालया अंतर्गत मीरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणार्‍या रश्मी सिद्धार्थ या सोसायटीने भाडेकरूंची माहिती न देणार्‍यांवर कारवाईची करण्यासाठी चक्क पोलीस उपायुक्त व स्थानिक मीरा रोड पोलीस स्टेशन यांना पत्र दिले आहे. या सोसायटीमधील काही रूम मालकांनी त्यांची घरे भाड्याने दिली असून भाडेकरूंची भाडेकरार कागदपत्रे अद्याप सोसायटीकडे जमा न केल्यामुळे कारवाई करण्याकरता पोलिसांना पत्र व्यवहार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. आयुक्तलयामार्फत सोसायटीकडून प्राप्त झालेल्या पत्रावर कारवाई होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मीरा- भाईंदर, वसई -विरार पोलीस आयुक्तलयाच्या हद्दीतील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील नागरिकांना निवासी क्षेत्रांमधील सदनिका, प्लॉट,घर,हॉटेल, दुकान जागा इत्यादी भाडेतत्त्वावर देताना संबंधित मालकांनी भाडेकरू इसमांची सर्व कागदपत्रे सोसायटीचे सेक्रेटरी, चेअरमन व इस्टेट एजंट यांना व संबंधित पोलिस ठाण्यात भाडेकरूबाबत अत्यावश्यक माहिती व कागदपत्रे तीन दिवसांच्या आत ईमेल किंवा टपालाद्वारे देणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कलम १८८ प्रमाणे पोलिसांकडून कारवाई करण्यात येते.

मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयामध्ये स्थलांतरित नागरिकांच्या वास्तव्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.स्थलांतरित नागरिकांना घर, सदनिका, दुकान, हॉटेल, जागा इत्यादी भाडेतत्त्वावर देताना संबंधित घर मालक हे भाडेकरूंच्या ओळखीबाबत कोणतीही शहानिशा न करता नागरिकांना घरे भाड्याने देतात व त्यांच्याकडून ओळखी बाबत कोणतीही कागदपत्रे घेत नाहीत, असे निदर्शनास आले आहे. त्यापैकी काही लोक अवैध व्यवसाय, गुन्हे व समाज विरोधी कृत्यांमध्ये सामील असल्याचे दिसून आले आहे. अशा काही इसमांमुळे निर्माण होणार्‍या संकटांवर प्रतिबंध घालण्यासाठी त्यांची माहिती पोलीस ठाण्यात अद्यावत करणे अत्यावश्यक आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -