घरपालघरवर्षभरात २१ भ्रष्ट सरकारी बाबूंना लाच घेताना धरले

वर्षभरात २१ भ्रष्ट सरकारी बाबूंना लाच घेताना धरले

Subscribe

पालघर जिल्ह्यात २०२१ साली लाचखोरीच्या १४ प्रकरणांमध्ये २२ जणांना अटक झाली होती.

सचिन पाटील,बोईसर: सरकारकडून रग्गड वेतन आणि लाभ मिळून देखील भ्रष्ट सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांचा लाच घेण्याचा मोह सुटत नसून पालघर जिल्ह्यात २०२२ या वर्षभरात २१ जणांना लाचखोरी प्रकरणात गजाआड व्हावे लागले आहे.यामध्ये महसूल विभाग नेहमीप्रमाणे आघाडीवर राहिला आहे. पालघर जिल्ह्यात २०२२ या वर्षात लाचखोरीच्या १६ प्रकरणांत एकूण २१ शासकीय अधिकारी,कर्मचारी आणि खासगी इसमांना अटक करण्यात जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश आले आहे.यामध्ये महसूल विभाग सर्वाधिक ०५,त्या खालोखाल पोलीस ०३,मराविमं ०२,वनविभाग ०२,ग्रामविकास ०१,आरोग्य ०१,शिक्षण ०१,कृषी ०१ आणि खासगी इसम ०१ या लोकसेवकांचा समावेश आहे.सरत्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात पालघर मराविमं विभागाच्या अधिक्षक अभियंता किरण नागावकर आणि कार्यकारी अभियंता प्रताप मचिये यांसारखे बडे सरकारी अधिकारी लाचखोरी प्रकरणात गजाआड झाल्याने सरकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा रोग कितीतरी खोलवर पसरल्याचे सिद्ध झाले आहे.लाचखोरीत महसूल विभाग आणि पोलीस विभाग यांची आघाडी कायम राहिली असून पालघर जिल्ह्यात मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेन,मुंबई -वडोदरा एक्सप्रेस वे,वेस्टर्न डेडीकेटेड फ्रेट कॉरीडॉर,पश्चिम रेल्वे चौपदरीकरण या मोठ्या पायाभूत प्रकल्पांच्या भूसंपादन मोबदल्यापोटी वाटपामध्ये करोडो रुपयांची माया कमविल्याची चर्चा होताना दिसत आहे. पालघर जिल्ह्यात २०२१ साली लाचखोरीच्या १४ प्रकरणांमध्ये २२ जणांना अटक झाली होती.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची उत्तम कामगिरी

- Advertisement -

उपअधिक्षक नवनाथ जगताप व पोलीस निरीक्षक स्वपन बिश्वास यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग उत्तम कामगिरी बजावत असून नागरिकांनी देखील सरकारी कार्यालयांमध्ये छोट्या-मोठ्या कामांसाठी लाच मागणार्‍या भ्रष्ट अधिकारी व कर्मचार्‍यांविरोधात तक्रार देण्यासाठी निर्भयपणे पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -