घरपालघरखराब वातावरणाचा आंबा उत्पादनावर परिणाम

खराब वातावरणाचा आंबा उत्पादनावर परिणाम

Subscribe

पालघर जिल्ह्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून सर्वाधिक लागवड पालघर, डहाणू, विक्रमगड व वाडा तालुक्यात आहे.

वाडा: पालघर जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी फळबाग शेतीकडे वळला आहे. विशेषतः आंबा पिक मोठ्या प्रमाणावर घेत आहे. मात्र यावर्षी वारंवार येत असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहरावर (फुलांवर) परिणाम होत असल्याने निम्म्याहून अधिक उत्पन्न घटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खराब हवामानाचा मोठा फटका आंबा उत्पादक शेतकर्‍यांना बसणार असल्याने शेतकरी हिरमुसला आहे. खरिप हंगामात भात हे एकमेव पीक घेणारा येथील शेतकरी आता फळबाग शेतीकडे अधिक केंद्रीत झाला आहे. चिकू, आंबा, पपई ही पिके मोठ्या प्रमाणावर घेत आहेत. विशेषतः आंबा पिकाकडे अधिक वळल्याने मुंबईतून व्यापारी या भागात येऊन येथील आंबा खरेदी करीत असतात. चांगली बाजारपेठ आणि ती जवळ असल्याने दरवर्षी आंबा पिकाचे क्षेत्र वाढत आहे. काही दिवस सातत्याने आलेल्या ढगाळ वातावरणामुळे येथील आंब्यावरील मोहोर गळण्याचा व करपण्याचे प्रमाण वाढले आहे. या खराब हवामानाचा मोठा फटका आंबा उत्पादनावर झाला आहे. दरवर्षी निसर्गाचा वाढत चालेलेला लहरीपणा त्याच बरोबर लांबत असलेला पाऊस, अवकाळी पाऊस व त्यामुळे वातावरणात होणारा बदल याचा परिणाम फळबाग पिकांवर होत आहे. पालघर जिल्ह्यात दोन हजार हेक्टर क्षेत्रावर आंबा लागवड असून सर्वाधिक लागवड पालघर, डहाणू, विक्रमगड व वाडा तालुक्यात आहे.

 

- Advertisement -

केशर वाणाची अधिक लागवड

पालघर जिल्ह्यात हापूस आंब्यापेक्षा केशर वाणाला शेतकरी अधिक पसंती देत असल्याने जवळपास 70 टक्के आंबा लागवड ही केशर वाणाचीच दिसून येत आहे. महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडून आंबा लागवडीसाठी हेक्टरी 80 हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. दरवर्षी येथील शेतकरी या अनुदानाचा लाभ घेऊन आंबा लागवड क्षेत्र वाढवित आहेत.

- Advertisement -

 

ज्या आंबा उत्पादक शेतकर्‍यांनी आंबा पिक विमा घेतला आहे, अशा शेतकर्‍यांना विमा कंपनीने नुकसान भरपाई दिली पाहिजे.
प्रदीप गोरे – आंबा उत्पादक शेतकरी, गोरे, ता. वाडा

वातावरणातील बदलामुळे आंबा पिक लांबले आहे. मोहोर लागण्याची प्रक्रिया सुरु आहे. स्थानिक कृषी सहाय्यकांचे मार्गदर्शन घेऊन योग्य वेळी, योग्य त्या औषधांची फवारणी करावी.
दिलीप नेरकर – कृषी अधिक्षक, पालघर जिल्हा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -