मनोर :अखेर आपला महानगर च्या बातमी नंतर महामार्ग प्रशासनाने 17 तारखेला सकाळपासून ते खड्डे बुजवण्याचे काम महामार्ग प्रशासनाने हाती घेतले आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दुर्वेस गावच्या हद्दीतील उड्डाणपुलावर मुंबई मार्गिकेवरील पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून भरधाव वेगातील जीपचा टायर फुटल्याने अपघात झाला होता.मंगळवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास झालेल्या अपघातात चालक गंभीर जखमी झाला होता.त्याला उपचारासाठी मनोरच्या आस्था रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची परिस्थिती गंभीर असल्याकारणाने नंतर त्याला मुंबईला हलवण्यात आले.
खड्ड्यांमुळे महामार्गावरील वाहनांचा वेग मंदावला असून वाहनांमध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे.महामार्गावरील खड्ड्यांमुळे वारंवार होत असलेला अपघातांमुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.महामार्गावरील खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालकांकडून केली जात आहे. दोन दिवसांपूर्वी दुर्वेस उड्डाणपुलावरील खड्ड्यांमुळे अनियंत्रित झालेला ट्रक दुभाजक ओलांडून क्रूड ऑइलच्या टँकरला धडक दिल्याने टँकर पुलावरून खाली पडला होता. तर दुसरे वाहन रस्त्याच्या मधोमध पालटले होते. ज्यात काही काळ वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. भरधाव वेगातील वाहने महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये आदळून टायर फुटण्याचे प्रमाण वाढले आहे.खड्ड्यांमुळे महामार्गाची दुरवस्था झाल्याने मंगळवारी सकाळपासून दुर्वेस ते ढेकाळे गावच्या हद्दीत चार अपघात झाल्याने वाहन चालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या एकाच खड्ड्यांमुळे कमीत कमी 20 ते 22 वाहनांच्या टायर फुटले होते.दोन मोठे अपघात झाले होते. ज्यात दोघेजण गंभीर जखमी झाले होते तर काही गाड्यांचे अतोनात नुकसान झाले होते.
- Advertisement -
- Advertisement -