घरमहाराष्ट्रLok Sabha 2024 : ब्रह्मदेव आला तरी आता माघार नाही, बच्चू कडूंचे...

Lok Sabha 2024 : ब्रह्मदेव आला तरी आता माघार नाही, बच्चू कडूंचे नवनीत राणांना आव्हान

Subscribe

मुंबई : अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना आमचा विरोध असून ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही आता माघार घेणार नाही, असा निर्धार प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी व्यक्त केला. कडू यांच्या निर्धारामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. मला सागर बंगल्याची भीती दाखविणाऱ्या आमदार नितेश राणे यांनाच सागर बंगल्याची भीती असेल आम्हाला नाही. आमचा नेता दिल्लीत नाही तर, गावात बसलेला मायबाप शेतकरी आहे, असे प्रत्युत्तरही बच्चू कडू यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना दिले आहे.

हेही वाचा – Ramdas Athawale : आठवले म्हणाले, माझ्या ‘या’ मागण्या भाजपकडून मान्य..!

- Advertisement -

अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिली असून त्याला बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. राणा यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातूनही विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नावाचे वादळ आमच्या सागर बंगल्यात शमवले जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी उत्तर दिले. सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना असेल, आम्हाला नाही. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. आमचा स्वाभिमान आहे. गुलामीत राहण्याची आम्हाला सवय नाही. आम्ही सर्व ताकदीनिशी लढू, असा निर्धारच बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा – Rohit Pawar : हा खऱ्या मागासवर्गावरील घोर अन्याय, रश्मी बर्वेंसंदर्भात रोहित पवारांची प्रतिक्रिया

- Advertisement -

वास्तविक नितेश राणे यांची रक्ततपासणी केली पाहिजे. बच्चू कडू 20 वर्षे अपक्ष लढत आहे. ना झेंडा आहे, ना नेता आहे. आमचा नेता मुंबई, दिल्लीत बसलेला नाही. आमचा नेता गावात बसलेला आहे, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी राणे यांना सुनावले. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आदर करतो. त्यांनी आम्हाला दिव्यांग मंत्रालय दिले. पण आमचाही पक्ष आहे. आम्हाला ही निवडणूक लढायची आहे. आमची लढत मैत्रीपूर्ण असेल. बच्चू कडू युतीचा धर्म पाळत नाहीत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपाला वाटत असेल तर त्यांनी खुशाल कारवाई करावी. माझ्यावर साडेतीनशे गुन्हे आहेत. बच्चू कडू कुणाला घाबरत नाही, असे ते म्हणाले.

भाजपा हा फार मोठा पक्ष आहे. मी अमरावतीत उमेदवार दिल्याने एवढ्या मोठ्या पक्षाला फार फरक पडणार नाही. कुणाचा फोन आला, काही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही. आमचा बाप शेतमजूर आहे. आम्हाला थांबवण्याची ताकद भारतात कुणात नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.

हेही वाचा – Maharashtra Politics : वसंत मोरे- प्रकाश आंबेडकर भेटीने राज्यात नवे राजकीय समीकरण?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -